पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार..

पाचोरा-
दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी पाचोरा येथील डॉक्टर्स असोसिएशन तर्फे नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्षा ताईसो सौ. सुनीताताई पाटील व उपनगराध्यक्ष माननीय किशोर बारावकर यांचा सत्कार पाचोरा भडगाव विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमात पाचोरा डॉक्टर असोसिएशन तर्फे डॉ. जिवन पाटील, डॉ.स्वप्निल पाटील, डॉ. अजयसिंग परदेशीं, डॉ. भरत पाटील, डॉ. झाकीर देशमुख, डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. दिनेश सोनार, डॉ. विजय जाधव, डॉ. अतुल पाटील, डॉ. चंद्रकांत विसपुते, डॉ. राहुल पटवारी, डॉ. नंदकिशोर पिंगळे, डॉ. मुकेश तेली, डॉ. कुणाल पाटील, डॉ. बालकृष्ण पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी, डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. चेतन राजपूत, डॉ. किरण राजपूत, डॉ. प्रशांत शेळके, डॉ. दीपक चौधरी, डॉ. व्येंकटेश जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी पाचोरा डॉक्टर असोसिएशन च्या प्रलंबित गोष्टींची मा. आमदार अप्पासाहेब किशोर पाटील यांच्याशी चर्चा होऊन त्याबाबत लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिले.



