क्राईमजळगाव जिल्हा

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार;पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील एका शिवारात एका १८ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडित मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे.पाचोरा पोलीस स्टेशन येथे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी विशाल बागडे (मूळ रा. चिंचोरी, ता. नांदगाव, जि. नाशिक ह.मु. गाळण, ता. पाचोरा) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून मे २०२३ पासून, जेव्हा पीडिता अल्पवयीन होती, तेव्हापासून आरोपीने तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार पाचोरा तालुक्यातील एका शिवारातील खदाणीत आणि पीडितेच्या राहत्या घरी वेळोवेळी घडला. लग्नाचे आमिष दाखवून केलेल्या या सततच्या अत्याचारामुळे पीडित तरुणी गर्भवती राहिली आहे.
पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने पाचोरा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केल्याने पाचोरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम आणि पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!