पाचोरा नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ज्ञानोत्सव-नॉलेज फेस्टिव्हल २०२६

पाचोरा-
किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित नर्मदा इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई प्रस्तावित), पाचोरा येथे प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ‘ज्ञानोत्सव – नॉलेज फेस्टिव्हल २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भडगाव रोडवरील अंतुर्ली फाट्याजवळील शाळेच्या परिसरात होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाईजी राधेश्यामजी चांडक राहणार असून सुनिताताई किशोर पाटील (लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरपरिषद पाचोरा) या प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रा. गणेश शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहतील.या कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार किशोर आप्पा पाटील (पाचोरा-भडगाव मतदारसंघ) असून प्रमुख पाहुणे म्हणून संजय पाटील (मुंबई), मुमित किशोर पाटील (गटनेते व नगरसेवक, नगरपरिषद पाचोरा) तसेच डॉ. प्रियंका पियुष पाटील (संचालक, स्वॉयन क्लिनिक, पुणे) उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे समन्वयन प्राचार्य राधिका सलिष प्रभू करीत आहेत.
यावेळी शाळेच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी ते सातवीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली. शाळेत सीबीएसई पाठ्यक्रमावर आधारित आधुनिक व कृतीयुक्त अध्यापन पद्धती राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे.
शाळेत स्मार्ट डिजिटल वर्गखोल्या, इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड, एआय व कोडिंग लॅब, रोबोटिक्स लॅब, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, वातानुकूलित वर्गखोल्या आणि सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित परिसर अशी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना देण्यासाठी भव्य खेळाचे मैदान, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि मूल्याधारित शिक्षणावरही विशेष भर दिला जाणार आहे.विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध असून इच्छुक पालकांनी तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी ९०४४१८३१११ व ९०४४१८४१११ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.



