श्री.गो.से.हायस्कूलमध्ये आर.बी.तडवी यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न..

पाचोरा-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल येथे पर्यवेक्षक आर.बी.तडवी सर 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे यांनी केले.संस्थेचे चेअरमन मा.नानासाहेब संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते आर.बी.तडवी सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन मा.नानासाहेब व्ही.टी.जोशी, ज्येष्ठ संचालक अर्जुनदास पंजाबी, भागवत महालपुरे , प्रकाश पाटील ,संस्थेचे मान्यवर, माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक शिक्षक,आप्तेष्ट व नातलग यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर.एल पाटील, पर्यवेक्षिका सौ.ए.आर. गोहिल ,पर्यवेक्षक आर.बी.बांठिया, क्रीडा प्रमुख एस.पी. करंदे, कार्यालयीन प्रमुख ए.बी.सिनकर, किमान कौशल्य प्रमुख मनीष बाविस्कर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तडवी सरांना भावी निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
उपमुख्याध्यापक आर .एल .पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.टी.कौंडिण्य, सु.गी.पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव चे मुख्याध्यापक ए.बी.अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर बी.बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन आर.एन.सपकाळे यांनी केले.



