जळगाव जिल्हा

पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन हद्दीतील कुऱ्हाड परीसरात चोरून लपून सट्टा मटका सुरूच, कारवाई होईल का?

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन हद्दीतील कुऱ्हाड परीसरात अवैध सट्टा मटका (कल्याण ,मिलन)चोरुन लपून सुरू असल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत असतानाच, प्रत्यक्षात दुकानांच्या आडोशाला बसून सट्टा लिखाण सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

आजची तारीख असलेली चिठ्ठी मिलन डे

विशेष म्हणजे, हा सट्टा व्यवसाय अगदी पोलीसांच्या नाकाखालीच सुरू असून, संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “कारवाई होते की फक्त दाखवली जाते?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.स्थानिकांच्या माहितीनुसार, सट्टा माफिया आता अधिक शक्कल लढवत असून, दुकानांच्या मागील भागात किंवा आडोशाला बसून सट्टयाचा पानट्या (चिठ्ठी)लिखाण करत आहेत. यामुळे पोलीसांची गस्त आणि कारवाई यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, “अवैध धंदे पूर्णपणे बंद झाले” असे सांगणाऱ्यांचे दावे आता पूर्णपणे पोकळ ठरत आहेत. पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यावर ठोस कारवाई करुन परीसरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी जोरदार मागणी सुज्ञ नागरीकांकडून होत आहे.

आजची तारीख असलेली चिठ्ठी कल्याण

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!