जळगाव जिल्हा

तलाठी अतुल देवरे यांची चौकशी होऊन बदली करण्यात यावी तहसीलदार यांना निवेदन…

पाचोरा-

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बाळद येथे तलाठी पदावर कार्यरत असलेले अतुल देवरे यांची चौकशी होऊन तात्काळ बदली करण्यात यावी या आशयाचे निवेदन पाचोरा नगरपरिषदेचे नगरसेवक संदिप रामदास पाटील यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशन यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे.
सदरच्या निवेदन त्यांनी असे म्हटले आहे की,अतुल देवरे हे बाळद तालुका पाचोरा येथे तलाठी या पदावर कार्यरत असून, त्यांनी पाचोरा शहरात सर्रास पैसे वसुलीचा धुमाकूळ माजवला आहे.

त्यांच्या विषयी शहरात बरेच अशी उदाहरणे समोर आली आहे. ते दारू पिऊन रात्रीस मुलांना मारहाण करणे तसेच सर्वात मोठी बाब म्हणजे एखादे वाहन वाळूसह तहसील कार्यालयात जमा केल्या तहसिलदार साहेबांना माहीत नसतांना पंचनामा व योग्य ती कारवाई न करता संबधित मालकाकडून ५० हजार ते १ लाख रुपये घेऊन रात्रीस गेट खुले करून वाहन पळविण्यास त्यांचा सहभाग असतो.त्यांनी अनेक अशी कामे केली आहे त्यामुळे पाचोरा महसूल विभागास अडचणी तयार होतील त्यांचे किती वाळू वाहन चालकांसोबत संबंध आहेत व ते किती लोकांकडून पैसे वसूली करतात व अनेक विषय निष्पन्न करणे करीता आपण त्यांचा जवळ असलेल्या दोघही मोबाईलचे CDR मागवून ते आपण ते चेक करावे आणि ते जे व्हॉट्सअप वापरतात त्या कंपनी कडून त्या व्हॉट्सअप मॅसेजेस व कॉल हिस्ट्री मागवावी त्यात त्यांचे सर्व काळे धंधे समोर येतील आणि त्या एका तलाठ्यामुळे अनेक तलाठ्यानां विनाकारणाचा वादास सामोरे जावे लागते, कारण अतुल देवरे तलाठी हे हप्ता वसूली करत असल्यास वाहन इतर तलाठ्यांनी रेती सह पकडल्यास तेव्हा तो वाहन चालक सांगतो की मी अतुल देवरे तलाठी यांना हप्ता देतो तुम्ही माझे वाहन का थांबवले माझे वाहन सोडा,वाहन चालकाचे व संबंधीत तलाठ्याचे वादात रूपांतर होते.

तसेच,अतुल देवरे हे अरेरावीची भाषा वापरुन, माझी बदली कोणाच्या बापाने पण होणार नाही असे नेहमी चारचौघात बोलत असतात. माझे काय वाकडे करायचे ते करा असे नेहमी बोलत असतात. तरी, सदरील तलाठी विरुध्द आम्ही पाचोरा पोलिस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे.
या सर्व गोष्टींना अतुल देवरे हे कारणीभूत आहे. त्यामुळे अनेक तलाठ्यानां काम करण्यास अडचण निर्माण होत आहे. अतुल देवरे यांच्या काळ्या धंदे विषयी सर्वत्र चर्चा असून त्या संबधित माझ्याकडे व्हिडिओ स्वरूपात पुरावे आहेत. पाचोरा शहराचे शांततेचे वातावरण लक्षात घेता आपण एका व्यक्तिमुळे पाचोरा महसूल विभागाची होणारी बदनामी व येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आपण त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांची तात्काळ बदली करावी ही नम्र विनंती. तरी, सदरील मस्तवाल तलाठ्यास महसूल विभागाने जर पाठीशी घालून इतरत्र बदली केली नाही तर, आम्ही महसूल विभागाच्या मनमानी कारभारा विषयी आमरण उपोषण करू व पुढील होणाऱ्या परिणामांना आपण जबाबदार राहाल यांची नोंद घ्यावी.या स्वरूपाचे निवेदन नगरसेवक संदिप रामदास पाटील यांनी दिले आहे.निवेदन देतेवेळी पाचोरा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांची उपस्थिती होती.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!