क्राईमजळगाव जिल्हा

दोन गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त;पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पाचोरा-

जळगाव जिल्ह्यात दारुबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी व अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर यांच्या सूचनेनुसार पाचोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाघुलखेडा व तारखेडा शिवारात छापे टाकले.

पोलिस कारवाई करतांना

वाघुलखेडा शिवारातील हिवरा नदीपात्रात याकूब गनी हुसैन रिचवाले (वय 42, रा. सिंधी ता. भुसावळ, ह.मु. वाघुलखेडा) हा इसम अवैधरित्या दारू तयार करताना आढळून आला. त्याच्याकडून सुमारे 16 हजार रुपये किंमतीचे 150 लिटर गुळ, मोह व रसायन मिश्रित साहित्य तसेच 10 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशन गुन्हा क्रमांक 169/2026 अन्वये दारुबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच तारखेडा शिवारातील धरणाखाली भगवान रघुनाथ भिल (रा. तारखेडा ता. पाचोरा) हा इसम अवैध दारू गाळताना पकडण्यात आला. त्याच्याकडून सुमारे 23 हजार रुपये किंमतीचे 200 लिटर कच्चे रसायन व 30 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 170/2026 नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस हवालदार योगेश पाटील,पो.ह.दिलीप वाघमोडे,पो.ह.हटकर यांनी केली आहे. या दोन्ही कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर मोठा आळा बसणार असल्याचे परीसरातुन बोलले जात आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!