सत्यशोधक चित्रपट करमुक्त करा समता सैनिक दला कडून मागणी.
पाचोरा-
सत्यशोधक हा ०५ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असुन हा चित्रपट महामानव थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारीत आसुन याचा इतिहास असा कि, महाराष्ट्रात १९ व्या शतकाच्या शेवटी व २० व्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक सामाजिक व राजकीय चळवळी उदयास आल्या.त्यामध्ये म.फुले यांनी सुरू केलेली सत्यशोधक चळवळ अंत्यत प्रभावी होती.आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात महत्वाचे स्थान असलेली ही चळवळ मराठी प्रदेशात ग्रामीण व अज्ञानी जनतेपर्यंत पोहोचलेली पहिली चळवळ होय.
म. फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यापूर्वी महाराष्ट्रात मानवधर्म सभा,प्रार्थना समाज, आर्य समाज इ. सामाजिक संस्था अस्तित्वात होत्या.परंतु त्यांची ठेवण व पध्दती मुख्यतःआध्यात्मिक व धार्मिक होती.बहुजन समाज व गोरगरीब जनता अन्नास महाग झाली होती.परंतु वरील सामाजिक संस्था या दुबळ्या,निरक्षर सामान्य जनतेचे ऐहिक व सामाजिक प्रश्न सोडवू शकत नव्हत्या म्हणूनच अब्राह्मण समाजाच्या उध्दारासाठी सामाजिक विषमता नष्ट करावयाची असेल तर कनिष्ठ वर्गांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत म्हणून २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुणे येथे म.फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून सुमारे ६० लोक जमले होते. फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या अनुयायासाठी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा ग्रंथ लिहिला.या समाजाचे सदस्यत्व सर्व जातीतील लोकांना खुले होते!सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणून जोतीरावांची निवड झाली.नारायण गोंविदराव कडलक यांची कार्यवाह म्हणून निवड झाली.अशी माहीती जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांनी उपस्थितीना दिली याच अनुषंगाने “सत्यशोधक” हा मराठी चित्रपट करमुक्त करण्यात यावा अशी मागणी समता सैनिक दल(संस्थापक विश्वरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर)यांच्या कडून जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बी.डी.पाटील पाचोरा यांना लेखी निवेदन देवून करण्यात आली.सदर निवेदन हे
समता सैनिक दलाचे उपजिल्हा प्रचारक पिंटू सावळे तालुका प्रचारक शांताराम सपकाळे पाचोरा सह तालुका प्रचारक राहुल गायकवाड पाचोरा यांनी दिले.