नवी मुंबई-
दिनांक 26 जून म्हणजेच लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती. या दिनानिमित्ताने नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे नवी मुंबई येथे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती खूप उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथमता राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक दिपक बडगुजर यांनी पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर शाळेतील इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल आपल्या भाषणातून विचार व मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी खूप छान शब्दात शाहू महाराज यांच्या विषयी यांच्या जीवन कार्याविषयी सामाजिक न्याय व समते विषयी सुंदर विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक दिपक बडगुजर यांनी लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याविषयी बोलताना कोरोना ,प्लेग , स्वस्त धान्य दुकान व मोफत शिक्षण याविषयी खूप सुंदर विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या झाकणे यांनी तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सारिका पाटील,महादेव तोंडे , विकी मोरे ,मंदा पिंगळे यांनी परिश्रम घेतले.