नाशिक सिडको-
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुलींवरील, महिलांवरील अत्याचाराचे अनेक घटना उघडकीस येत आहेत. बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला, तर मुंबईत एका नराधम पित्याने 9 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. मुलींच्या, महिलांच्या सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर महिला, युवतींना स्वसंरक्षणाची जबाबादारी घेतली पाहिजे, असे सांगत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली. मात्र तेव्हा त्या तरूणीने शांत बसून अन्याय सहन न करता त्या नराधामांना चांगलाच धडा शिकवला. आईची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना एका तरूणीने बेदम चोप दिला, खुर्चीनेही हाणल्याची घटना नाशिकच्या पवननगर परिसरात घडली आहे. तिचा हा रणरागिणीचा अवतार पाहून लोक थक्क झाले. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक मधील पवननगर परिसरातील हेडगेवार चौकात हा छेड काढण्याचा प्रकार घडला. काही टवाळखोर रस्त्यावरील बेंचवर बसून रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांची, मुलींची छेड काढत होते. एक तरूणी व तिची आई रस्त्याने जात अस्ताना त्यांनी तिचीही छेड काढली. सुरुवातीला महिलेने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्या तरूणांना आणखीनच चेव चढला आणि त्यांनी पुन्हा छेडछाड सुरू केली. टवाळखोरांनी आईची छेड काढत असल्याचे पाहून त्या मुलीचं डोकंच फिरलं. त्यांनी भर रस्त्यातच त्यांना चांगलाच चोप दिला.
महिलेने त्या टवाळखोराला आधी जाब विचारला, पण त्याने अरेरावी करत हुज्जत घालण्यास सुरवात केली. यानंतर महिलेचा पारा चढला आणि महिलेने रणरागिणीचे रूप धारण करून त्याला चोप देण्यास सुरुवात केली. रस्त्यावर बाजूने एक भंगरवाल्याची हातगाडी जात होती, तिने त्या गाडीवरून एक खुर्ची उचलली आणि त्याचा प्रसाद देत अद्दल घडवली.
त्या दोघींनी त्या तरूणांना बेदम चोप देत धडा शिकवला. हा संपूर्ण प्रकार त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतोय. अन्याय सहन करता , छेड काढणाऱ्या अद्दल घडवणाऱ्या , त्या रणरागिणींच्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. छेड काढणाऱ्या त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.