पोळा सणात गालबोट,अंतुर्ली येथे दोन गटात हाणामारी-परस्पर विरोधात २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
पाचोरा-
पोळा सणाची सर्वत्र धामधूम सुरू असतांनाच पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होवुन अनेक जण किरकोळ अथवा काही जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर दोन्ही गटातुन परस्पर विरोधात तब्बल २६ जणांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात बैल पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे या सणाला गालबोट लागले असुन किरकोळ कारणाचा ओहापोह करत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थीती नियंत्रणात आणली.
पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे सालाबादप्रमाणे यंदाही पोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात येत होता मात्र दरम्यान गावातील पोळा फुटल्यानंतर सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास शेतकरी हे गावात बैल मिरवित असतांनाच भाऊसाहेब नाना पाटील यांच्या बैलाचा तेथुन जाणाऱ्या अल्ताफ मेहबुब खान यांच्या मोटरसायकलला धक्का लागला. या कारणावरून वाद उद्भवला. व दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत रुपेश दिपक पाटील व भाऊसाहेब नाना पाटील यांच्या कपाळावर लाकडी दांडक्याने मारहाण झाली. त्यांचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. तर दुसरीकडे गजालाबी मेहबूब खान यांना कंबरेला व कानाजवळ गंभीर दुखापत, जुबेर अनिस पठाण यांचे डोक्याच्या मागील भागात गंभीर दुखापत होवुन सात टाके पडले, यासोबतच जुबेर पठाण व अर्शद खान हे देखील जखमी झाले. यातील जुबेर अनिस पठाण, अर्शद खान व गजालाबी खान यांना रात्रीच जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. घटनेनंतर रात्री उशिरा पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये प्रणव बाळु पाटील यांच्या फिर्यादीवरून अल्ताफ मेहबूब खान, अकबर वजीर खान, अनिल वजीर खान, जुबेर अनिस खान, जुनेद अनिस खान, अमिन इद्रिस खान, सद्दाम साहेब पठाण, नदीम मुजावर अय्यर, अजाज शौकत पठाण, अमर अकबर खान, जुबेर अकबर खान, अजमत वजीर खान, अन्सार मुसा खान, सलमान खान, भिकन नजीर, अमिन बाबु, भुरा बाबु, गजालाबी मेहबूब खान सर्व रा. अंतुर्ली ता. पाचोरा व मुश्ताक सांडु शेख (वय – २१) रा. अंतुर्ली ता. पाचोरा यांच्या फिर्यादीवरुन मनोज पाटील, प्रकाश देविदास पाटील, निखील संजय पाटील, लालु लक्ष्मण पाटील, प्रणव बाळु पाटील व तीन अनोळखी इसम अशा परस्पर विरोधातील तब्बल २६ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या घटनेतील ७ संशयित आरोपींना पोलिसांनी दिनांक 3 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरित संशयित आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोन्ही घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी व पो. हे. काॅ. अशोक हटकर हे करीत आहे.