जळगाव जिल्हा काँग्रेसचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न..
जळगाव-
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्यावतीने जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच प्रदेश काँग्रेसने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष व जळगावच्या प्रभारी प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार शिरीष चौधरी माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील प्रदेश सचिव विनोद कोळपकर माजी प्रदेश सरचिटणीस एडवोकेट सलीम पटेल काँग्रेस जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे इंटक विभागीय अध्यक्ष नरेंद्र राजपूत अमळनेर काँग्रेस नेते डॉक्टर अनिल शिंदे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शाम तायडे किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष प्राध्यापक सुभाष पाटील माजी नगराध्यक्ष मोहम्मद दारा भाई जाफर भाई अनिल निकम श्रीधर चौधरी हे उपस्थित होते. यावेळी प्रदेश काँग्रेस मार्फत नियुक्ती झालेल्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून एडवोकेट अविनाश भालेराव जिल्हा कार्याध्यक्ष भगतसिंग पाटील किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सुनील पाटील यांचा यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रतिभाताई शिंदे यांनी आपल्या मनोगत सांगितले जळगाव जिल्हा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देईल सर्वांनी एकत्र येऊन काँग्रेसचा काम करून काँग्रेस संघटन वाढवून मजबूत करून येणाऱ्या काळात जिल्हा काँग्रेसने करणार आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे गटबाजी न करता सर्वांनी काँग्रेससाठी काम करावे मी कोणत्याही गटाचा नाही यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम भाऊ तायडे यांनी केले सूत्रसंचालन अल्पसंख्यांक काँग्रेसचे मोहम्मद मुनवरखान यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विशाल पवार यांनी केले यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी महिला युवक उपस्थित होते.