जळगाव जिल्हा

स्व.आर.ओ. तात्यांच्या आठवणींनी गहिवरला निर्मल परिवार !
जयंती दिनी पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर भावपूर्ण अभिवादन

पाचोरा-

माजी आमदार तथा निर्मल समूहाचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या तिथीनुसार जयंतीदिनी अभिवादन करतांना निर्मल परिवार अक्षरश: गहिवरल्याचे दिसून आले. तात्यासाहेबांनी दिलेल्या मार्गावरून चालण्याचा संकल्प याप्रसंगी घेण्यात आला.पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली सारख्या अतिशय लहानशा खेड्यातील आत्यंतीक गरिबीची परिस्थिती असणाऱ्या घरात जन्मलेल्या तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांनी आपल्या कर्तबगारीने जीवनात देदीप्यमान कामगिरी केली. त्यांनी ‘आदर्श कृषी सेवा केंद्र’ व निर्मल समूहाच्या माध्यमातून व्यापार व कृषी उद्योजकतेत तर यश संपादन केले. याच्या जोडीला निर्मल स्कूलसारखी अद्ययावत शिक्षण देणारी संस्था उभी केली. तसेच त्यांनी राजकारणातही सेवेचा मापदंड प्रस्थापित केला. त्यांच्या अकाली जाण्याने निर्मल समूहावर आघात झाला असला तरी तात्यासाहेबांच्या शिकवणीमुळेच आज हा समूह प्रगतीपथावर आहे. दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या जयंती दिनी निर्मल परिवाराने आदरांजली अर्पण करतांना सर्वांच्या डोळ्यात अश्रू तर होतेच पण तात्यासाहेबांनी दिलेला कर्मयोगाचा मूलमंत्र बाळगत जोरदार आगेकूच करण्याचा पोलादी संकल्प देखील सर्वांच्या मनात होता.

तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचा प्रयोगशाळेच्या आवारात असलेल्या भव्य पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून सर्वांनी तात्यांना अभिवादन करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या निवडणुकीत वैशालीताई सुर्यवंशी यांना यश लाभावे अशी प्रार्थना अनेकांनी गदगदलेल्या भावदशेत केली.

याप्रसंगी श्रीमती कमलताई पाटील, वैशालीताई सुर्यवंशी, जे. सी. राजपूत, डॉ.एस. एस. पाटील,  डी.आर. देशमुख, सुरेश पाटील,  नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी, उध्दव मराठे, रमेश बाफना, मेहताबसिंग नाईक, दिलीप भांडारकर, अभय पाटील, गणेश परदेशी, मनोहर चौधरी, राजेंद्र देवरे, शरद पाटील, विकास वाघ, अनिल सावंत, दीपक पाटील, भरत खंडेलवाल, राजू काळे, योजना पाटील, तिलोत्तमा मौर्य, कुंदन पंड्या, कोमलसिंग देशमुख, कैलास क्षीरसागर, डॉ. एल. टी. पाटील, प्रेमराज पाटील, प्रितेश जैन, राजूभैय्या पाटील, समाधान पाटील, मिथुन वाघ, रवींद्र पोपट पाटील, रवी पाटील, दत्तू अहिरे, एकनाथ महाजन, देविदास पाटील, संदीप जैन, मनोज चौधरी, बंटी हटकर, राजू कोळी, बापूअण्णा, मच्छींद्रआबा, पप्पूदादा, शाम सर, तुकाराम महाजन, सतीश पाटील, दीपक पाटील, शंकर मारवाडी, के. के. पाटील, राजू मोरे, गोरखदादा, दत्तू मारोळे, विजय साबळे, रतन परदेशी, राजू चव्हाण, शाम सर, संजू महाजन, हरीभाऊ पाटील, विकास वाघ, हिलाल वाघ, विनोद बाविस्कर, चंदू सोनवणे, दादाभाऊ चौधरी, जयश्री येवले, लक्ष्मी पाटील, मनीषा पाटील, अनिता पाटील, बेबा पाटील, गोपाळ परदेशी, प्रमोद पाटील, अनिल देशमुख, दगडू शिंदे, राजेंद्र पाटील, आदी मान्यवरांसह निर्मल परिवारातील सर्व सदस्यांची उपस्थिती होती.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!