आमडदे येथे नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या सहविचार सभेला उदंड प्रतिसाद..
भडगाव-
पाचोरा भडगाव विधानसभेसाठी आमडदे येथील इच्छुक उमेदवार नानासो प्रतापराव हरी पाटील यांच्या उमेदवारी संबंधित सहविचार सभा गावकऱ्यांच्या तुफान प्रतिसादाने उत्साहात संपन्न. सहविचार सभेचे अध्यक्ष माजी पोलीस पाटील तानाजी सांडू पाटील हे होते. व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नानासाहेब प्रतापराव पाटील,जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ पूनमताई प्रशांतराव पाटील, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश अशोक पाटील,माजी सरपंच संजय भास्कर पाटील, देवराम सदा भोसले,किशोर रघुनाथ पाटील,न्यावबा मावजी पाटील,धर्मराज तुकाराम पाटील मांगो रायला पाटील,अशोक नारायण पाटील,डी एन पाटील, योगीराज शालिग्राम पाटील तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींची उपस्थिती होती.
सहविचार सभेचे सूत्रसंचालक श्री दिपक भोसले सरांनी गावाची राजकीय,सामाजिक,शैक्षणिक पार्श्वभूमी सांगून, गावाचा राजकीय ऐतिहासिक वारसा व आमडदे गावाचा जिल्ह्यातील राजकीय दबदबा सविस्तर मांडला. सहविचार सभेत अनेक मान्यवरांनी आपली मनोगते मांडली.त्यात माजी सरपंच संजय भास्कर भोसले यांनी गावाने तालुका व जिल्हा स्तरावर अनेक महत्त्वाची पदी भूषवलेली आहेत. आता वेळ आलेली आहे ती गावाच्या एकजुटीने विधानसभेवर नानासाहेबांना पाठवण्याची. जुलाल सोनवणे यांनी सांगितले की नानासाहेबांनी गावाचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास केलेला आहे. एकजुटीने प्रयत्न करून नानासाहेबांना आमदार केल्यानंतर याच गांधी चौकात आपण विजयी सभा घेणार असे सांगितले. विधानसभेत खऱ्या शेतकरी पुत्राला शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून नानासाहेबांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. माजी फौजी राजेंद्र हिरामण पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नानासाहेब दयेचा महासागर आहेत, त्यांना आपली ओळख सांगण्याची गरज नाही, शैक्षणिक राजकीय,सामाजिक,सहकार क्षेत्रात कार्य करून त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडलेली आहे. नानासाहेब विधानसभेची उमेदवारी करत नसून तर संपूर्ण आमडदे गाव विधानसभेची उमेदवारी करत आहे म्हणून एकजुटीने विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत अशी गावकऱ्यांना त्यांनी साद घातली. श्री डी एन पाटील यांनी आपल्या मनोगतात नानासाहेब स्मितभाषी,शांत,संयमी व कोणाविषयी द्वेषाची भावना नसणारे व्यक्तिमत्व आहे. गावाचे संबंध संपूर्ण मतदारसंघात असल्यामुळे प्रत्येकाने एकजुटीने आपल्या नातेवाईकांना नानासाहेबांना मतदान करण्यासाठी विनंती करायची आहे. जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश अशोक पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गावामुळे नेते मोठे झाले त्यामुळेच त्या नेत्यांना संपूर्ण जिल्हा ओळखतो. पाचोरा भडगांव विधानसभा मतदार संघातही आमदार म्हणून नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांना विजयी करून आपल्या गावाचे नाव राज्यस्तरावर नेण्यासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ पूनमताई प्रशांतराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की पक्षभेद बाजूला सारून,पक्ष न बघता माणूस बघून आपण सर्वांनी एकजुटीने इतिहासात नाव करण्याची नामी संधी आपल्याला चालून आलेली आहे. अभी नही तो कभी नही या उक्तीप्रमाणे गावकऱ्यांनी खारीचा वाटा उचलून नानासाहेबांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करावेत.
पाचोरा भडगाव विधानसभेचे उमेदवार आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांनी आपल्या मनोगतातून गावकऱ्यांना सांगितले की, गावाने तालुका व जिल्हा स्तरावर सर्व पदी उपभोगली. आता आपल्या गावाला हक्काचा खरा शेतकरी आमदार जो शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत परखडपणे मांडू शकेल अश्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी एकजुटीने काम करायचे आहे. पाचोरा भडगाव मतदार संघातील नातेवाईक व मतदारांचा भक्कम पाठिंबा गावोगावी मिळत आहे. नानासाहेब तुम्ही आमदार होणारच अशी ग्वाही मतदारसंघात गावागावांमध्ये नानासाहेबांना मिळत आहे. गावाचे आराध्य दैवत बहिरम बाबांचा आशीर्वाद व छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने पाचोरा भडगाव विधानसभेची निवडणूक मोठ्या मताधिक्याने निवडून येणार अशी भावनिक साद नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांनी गावकऱ्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक भोसले सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.