भडगाव शहरात नानासाहेब प्रताप पाटील यांच्या प्रचार रॅलीस मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद..
भडगाव-
भडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून भडगाव पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज दिनांक २ नोव्हेंबर वार शनिवार रोजी भडगाव शहरात त्यांच्या रॅलीस श्रीराम मंदिरापासून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुभाष पाटील यांच्या शुभहस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली यावेळी मतदारांनी प्रचार प्रसंगी त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत असल्याचे बघावयास मिळाले.. या प्रचार रॅलीचे वैशिष्ट्य तरुण आबालबुद्ध महिला यांची प्रचंड अशी संख्या पाहून शहरातील मतदार आकर्षित झाले. रॅलीत मतदारांना मतदान करण्यासाठी घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली .महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सप्तकिरण असलेले पेनाची निप हे चिन्ह व तिचा प्रचार प्रसार घरोघरी मोठ्या प्रमाणात करण्यात आला यावेळी नानासाहेब व डॉ पूनम ताई पाटील यांचे घरोघरी औक्षण करण्यात येत होते. त्यांच्या समवेत जगदीश बाळासाहेब पाटील, श्याम दादा पाटील डॉक्टर कमलेश भोसले अण्णासाहेब शिवाजी आत्माराम पाटील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हा निमंत्रक चेतन पाटील, तालुकाध्यक्ष प्रतीक पाटील,व शहरातील जेष्ठ नागरिक सहज तरुण मित्र यांच्यासह प्रचार रॅली श्रीराम मंदिरापासून करण्यात आली.नंतर बाजार चौक, खोल गल्ली, महादेव गल्ली, जागृती चौक ,जलाली मोहल्ला, कासार गल्ली, काकासट चौक, शनि चौक, वाचनालय गल्ली, मेन रोड, बस स्टँड परिसर , पाचोरा रोड, टोणगाव परिसर इत्यादी ठिकाणी रॅली नेण्यात आली. आणि समारोप करण्यात आला. रॅली चे स्वरूप प्रचंड होते याने परिसर दणाणून सोडला होता .