जळगाव जिल्हाराजकीय
नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचा संगमेश्वर सह परिसरात प्रचार दौरा संपन्न;मतदारांनी दिला उस्फूर्त प्रतिसाद
भडगाव-
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचा प्रचार दौरा पाचोरा भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार सुरू आहे.
संगमेश्वर सह परिसरातील गावांमध्ये संपन्न झाला या प्रचारादरम्यान मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन नानासाहेबांचे औक्षण करण्यात आले या प्रचारादरम्यान महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे चिन्ह सप्तकीरणातील पेनाची निप हे यावेळी घरोघरी पोहोचवण्यात आले व मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या आशीर्वाद घेण्यात आले या रॅलीमध्ये नानासाहेबांच्या समवेत शिवाजी पाटील,दिलीप पाटील विनायक देशमुख यांच्या सह स्थानिक कार्यकर्ते सहभागी होते यावेळी मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन नानासाहेबांना निवडून आणण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.