डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देणाऱ्या इसमाविरुध्द गुन्हा दाखल.
पाचोरा-
दिनांक २४/११/२०२४ रोजी सकाळी ०९-२५ वा. चे सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनला डायल ११२ वर इसमाने मोबाईल क्रमांक ७७९८८४४४९८ वरुन फोन करुन माहिती दिली की, पाचोरा शहरातील जारगाव चौफुली वर १५० ते २०० लोक विशीष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहे. त्यापैकी २ लोकांचा मर्डर झालेला आहे. त्यात चॉपर सारख्या हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे. तात्काळ पोलीस पाठवा बाबत फोन आलेला होता.
पाचोरा पोलीस स्टेशन कडील स्टाफ रात्री उशिरा पर्यंत निवडणुकीचा महत्वाचा बंदोबस्त करुन सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलचे गांभीर्य ओळखुन पाचोरा पोलीस ठाणे कडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जावुन मिळालेल्या माहिती प्रमाणे सखोल चौकशी करता फोन केल्याप्रमाणे सदर ठिकाणी कोणतीही घटना घडलेली नव्हती. फोन केलेल्या इसमाचा मोबाईल नंबर वरुन शोध घेतला असता शैलेश रविन्द्र पाटील रा. तामसवाडी ता. पारोळा जि.जळगाव हल्ली रा. जारगाव चौफुली पाचोरा हा मिळून आला त्यास घटनेबाबत विचारपुस करता त्याने कळवले की, मी मुददामहून पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे. तशी काही एक घटना घडलेली नाही.
इसम नामे शैलेश रविंन्द्र पाटील रा. तामसवाडी ता. पारोळा जि. जळगाव याने नागरीकांना व पोलीसांना त्रास व्हावा या हेतुने मुददामहून पोलीसांना डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देल्याने शैलेश पाटील याचे विरुध्द दिनांक २४/११/२०२४ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुनिल पाटील हे करीत आहे.
तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र पोलीस दलातर्फे डायल ११२ ही सुविधा महिला,मुली व जेष्ठ नागरीकांकरीता गंभिर प्रसंगी तात्काळ मदत उपलब्ध होण्याकरीता सुरु करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी डायल ११२ वर गंभिर प्रसंगीच पोलीस मदतीकरीता कॉल करावा. असे आवाहन पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या कडून करण्यात आली आहे.