गोपीचंद पुना पाटील,विद्यालयात “राष्ट्रीय खो-खो दिन” मोठ्या उत्साहात संपन्न..
भडगाव-
कोळगाव ता-भडगाव कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसन शिक्षण संस्था संचलित, गोपीचंद पूना पाटील, कनिष्ठ महविद्यालय, कोळगाव येथे “राष्ट्रीय खो-खो दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय खो-खो महासंघ तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशन तर्फे दरवर्षी १२ डिसेंबर रोजी “राष्ट्रीय खो-खो दिन” साजरा करण्यात येतो.संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील, मंत्रालयीन अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा.डॉ. चंद्रजीत जाधव,खजिनदार गोविंद शर्मा,सहसचिव जयांशू पोळ यांच्या प्रेरणेतून पार पडलेल्या या कार्यक्रमास गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील,कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एल.जी.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहक रघुनाथ पाटील, क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, राष्ट्रीय खो-खो पंच तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे प्रसिद्धी समिती सदस्य प्रेमचंद चौधरी तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.