जळगाव जिल्हा

पाळधी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न..

जळगाव-

राज्य शासनाच्या निर्देशानुसार “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” आज पालधी (ता. जामनेर) येथे माळी समाज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात विविध शासकीय विभागांनी सहभाग घेत एकाच छताखाली नागरिकांना थेट योजनांचे लाभ दिले.

या शिबिराचे उद्घाटन निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोलकर यांच्या प्रास्ताविकाने झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, रोजगार हमी योजना आदी विभागांनी थेट सेवा पुरवली.

विभागनिहाय लाभ वितरणात संजय गांधी योजना (DBT प्रक्रिया पूर्ण) – ३५० लाभार्थी,  तालुका कृषी अधिकारी कार्यालय – १०२ सेवा लाभ, पुरवठा शाखा (शिधापत्रिका) – ६७ लाभ, सेतू केंद्राद्वारे मिळालेले दाखले – उत्पन्न दाखले (३७), जातीचे दाखले (२४), वय/अधिवास/रहिवास दाखले (४६), ग्रामपंचायत विभाग (जॉब कार्ड वाटप) – १४ लाभार्थी असे  एकूण ६४० नागरिकांना थेट लाभ देण्यात आला. शिबिरात आलेल्या नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. “सर्व विभाग एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे कागदपत्रे मिळवणे आणि अर्ज प्रक्रिया खूपच सुलभ झाली,” असे अनेकांनी सांगितले. तर काहींनी “योजनेचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी तालुक्याच्या फेऱ्या कराव्या लागत होत्या, परंतु आज गावातच सर्व प्रक्रिया पूर्ण झाली,” असे मत व्यक्त केले.या उपक्रमाच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवली गेली असून, गावपातळीवरच नागरिकांना सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पालधी परिसरातील लोकांनी समाधान व्यक्त केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!