घरकुलचा दुसरा हप्ता, नमुना नंबर 8 देण्यासाठी, ग्रामसेवक, रोजगार सेवकाने घेतली 5 हजाराची लाच, एसीबीने पकडले रंगेहाथ..

पाचोरा-
भडगाव तालुक्यातील मांडकी येथील ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ (वय 47 रा. पाचोरा) रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय 38 रा. पाचोरा) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 5000 रुपये लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आणि गट नंबर नमुना 8 मिळवण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 6000 रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 5000 रुपये घेतांना त्यांना सापळा रचून कारवाई करण्यात आली.
जळगाव एसीबी यांना 23 जून 2025 रोजी भडगाव तालुक्यातील मांडकी येथिल एका इसमाने तक्रार दिली होती, घरकुलचा दुसरा हप्ता आणि गट नंबर नमुना 8 देण्यासाठी 6000 हजार रुपयांची मागणी केल्याबाबत तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करत,पाचोरा येथे एसीबीने सापळा रचत तडजोडीअंती पंचासमक्ष ग्रामसेवक सोनिराम धनराज शिरसाठ व रोजगार सेवक जितेंद्र लक्ष्मण चौधरी यास 5000 रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.
पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव,सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, सुभाष पावरा, हेमंत पाटील यांनी हि कारवाई केली.