जनमाणसात माझी बदनामी करणाऱ्यावर कारवाई करा,हरीभाऊ पाटील यांचे पाचोरा पोलीसांना तक्रारी निवेदन..

पाचोरा-
बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी दिनांक 12 ऑगस्ट रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला एक तक्रार निवेदन दिले आहे.त्यांनी तक्रार निवेदनात असे म्हटले आहे की,मी शासनहितार्थ व जनहितार्थ विविध क्षेत्रातील विविध प्रकारच्या तक्रारी आपणासह इतर विभागांच्या वरिष्ठांनाकडे पाठपुरावा करून होत असलेल्या चुकीच्या कामांना आळा बसविण्यासाठी मी तक्रारी करुन शासनाच्या नजरेत आणत असतो त्याच प्रकारे मी अवैध विक्री होत असलेल्या तसेच अवैध वाहतूक होत असलेल्या विमल गुटख्याच्या तक्रारी मी सतत करित असल्यामुळे पाचोरा शहरातील कुख्यात विमल गुटखा विक्रेता सनी पंजाबी यांच्या जिव्हारी लागल्यामुळे सनी पंजाबी बनावट बतावणी करून माझी सार्वजनिक ठिकाणी बदनामी करण्यासाठी स्वता हुन तो सांगत आहे कि हरिभाऊ तुकाराम पाटील हा मला पाच लाख रुपये मागत होता मी त्याला पाच लाख रुपये दिले नाही, म्हणून तो माझ्या विमल गुटख्याच्या तक्रारी करुन बातम्या प्रसिद्ध करत आहे माझी बदनामी करणाऱ्या अवैध विमल गुटखा विक्रेता सनी पंजाबी याने माझी जन माणसात बदनामी केल्या प्रकरणी सनी पंजाबी याचेवर गुन्हा दाखल होणे बाबत तक्रारी निवेदनात त्यांनी म्हटले आहे.पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माहे जुन २०२५ मध्ये पाचोरा शहरातील कॉलेज गेट परिसरात नाकाबंदी तपासणी दरम्यान आपल्या पोलिसांना अंदाजित 21 लाखांचे 40 पोते विमल गुटखा आढळून आला म्हणून आपल्या पोलीसांनी त्या गुटख्यावर जप्तीची कारवाई करुन गुटख्यासह सदर चे वाहन पाचोरा पोलीस ठाण्यात जप्त करुन गु.र.नं. 280/2025 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.वरिल प्रमाणे दाखल झालेल्या गुन्ह्यात वाहन चालकाला अटक करण्यात आली होती त्यावेळी वाहन चालकाला आपल्या पोलीसांनी विचारपूस केली असता हा गुटखा कोठुन आणला आणि कोणाकडे घेऊन जात होता त्यावेळी अटकेत असलेल्या वाहन चालकाने आपल्या पोलीसांना जबाबात सांगितले की हा माल धुळे येथुन भरला आणि पाचोरा येथे सनी पंजाबी याचे कडे पोहोच करायचा होता परंतु तुम्ही मध्येच मला पकडुन घेतले असा जबाब आपल्या अटकेतील वाहन चालकाने दिलेला आहे. वाहन चालकाने सनी पंजाबी याची माहिती आपल्या पोलीसांना जबाबात दिली याबाबत ची खबर पाचोरा येथील विमल गुटख्याचा मुख्य मालक सनी पंजाबी याला मिळाल्या नंतर सनी पंजाबी हा त्याच वेळी त्याचा मोबाईल बंद करून जळगांव येथुनच परस्पर पसार झाला होता.

आपल्या अटकेत असलेल्या वाहन चालकाने दिलेल्या जबाबाप्रमाणे सनी पंजाबी याला गु.र.नं. 280/2025 मधे मुख्य आरोपी आपल्या पोलीसांनी केलेले नाही म्हणून मी आपणास मुख्य विमल गुटखा मालकावर वाहन चालकाच्या जबाबनुसार गुन्हा दाखल करावा यासाठी निवेदन दिले आहे तसेच दाखल गु.र.नं. 280/2025 मध्ये मला मुख्य साक्षीदार म्हणून घेण्यात यावे यासाठी देखील मी लेखी अर्ज आपणास दिलेला आहे परंतु सदर गुन्ह्यात मला साक्षीदार म्हणून घेण्यात आले नाही तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपींचा शोध व तपास आपल्या तपास अधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेला नाही सदर गुन्ह्यांचा पारदर्शक तपास व्हावा विमल गुटख्याच्या मुख्य मालकावर तसेच विक्रेत्याला ताब्यात घेण्यात यावे यासाठी मी आपणास वारंवार निवेदन, तक्रार अर्ज आपणास सादर केलेले आहेत आपण ठोस कारवाई करीत नाही उलट मी दिलेल्या तक्रारींची, अर्जाची. निवेदनाची सविस्तर माहिती विमल गुटख्याच्या मुख्य विक्रेता सनी पंजाबी याला वेळेवर सहज पोहचवली जाते.
मी विमल गुटख्याच्या तक्रारी कुठेही करु नये या उद्देशाने सनी पंजाबी हा माझी सार्वजनिक ठिकाणी चर्चा करतो आणि सांगतो कि हरिभाऊ पाटील हा मला पाच लाख रुपये मागत होता मी त्याला पाच लाख रुपये दिले नाही म्हणून तो माझ्या विमल गुटख्याच्या बातम्या प्रसिद्ध करतो तक्रारी करतो, असे बनावट वक्तव्य करून माझी बदनामी सनी पंजाबी हा करीत आहे विमल गुटखा विक्री करणाऱ्या सनी पंजाबी याचेवर कायदेशीर कारवाई करून माझ्या या फिर्यादी प्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि दाखल केलेल्या गुन्ह्याच्या फिर्यादी ची सत्य प्रत मला उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच मी आपल्या पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या शासन हितार्थ व जनहितार्थ विविध क्षेत्रातील विविध प्रकारच्या प्रत्येक तक्रारींची आपण वेळीच दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी आपण माझ्या तक्रारी प्रमाणे वेळेवर कारवाई करीत नसल्यामुळे असे अवैध विमल गुटखा तस्कर, भ्रष्टाचार करणारे बेभान पणाचे वक्तव्य करुन सर्व सामान्य जनमाणसात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असतात त्या करीता मी दिलेल्या तक्रारीनुसार आपण वेळेवर उचित कारवाई करावी य आशयाचे तक्रार निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी आप्पा हटकर, विशाल हटकर उपस्थित होते.




