विस हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस हवालदाराविरूद्ध गुन्हा दाखल..

जळगाव-
तक्रार अर्जातील नमुद रक्कमेच्या दहा टक्के 20 हजार रुपयाची लाचेच्या स्वरूपात मागणी करणाऱ्या पोलिस हवालदाराविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पवार असे निंभोरा पोलिस स्टेशनला कार्यरत व लाचेची मागणी करणाऱ्या हवालदाराचे नाव आहे.या प्रकरणातील तक्रारदाराने शेतकऱ्यांकडून केळीचा माल घेऊन तो दिल्ली येथील व्यापाऱ्यास विक्री केला होता. मात्र या व्यवहारात पैसे न मिळाल्याने तक्रार अर्ज निंभोरा पोलिस स्टेशनला देण्यात आला होता. या तक्रार अर्जात नमुद रक्कमेच्या दहा टक्के रकमेची मागणी हवालदार पवार यांनी तक्रारदाराकडे केली होती.
याप्रकरणी तक्रारदाराने जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी केली असता हवालदार सुरेश पवार यांच्याविरुद्ध एसीबीच्या पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिनेशसिंग पाटील, हेडकॉन्स्टेबल किशोर महाजन, महिला हेडकॉन्स्टेबल संगिता पवार, पो.कॉ. राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी, भुषण पाटील, आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.





