क्राईमजळगाव जिल्हा

मोबाईल चोरट्याच्या पाचोरा पोलिसांनी आवळल्या काही तासांतच मुसक्या,

पाचोरा-

मोबाईल चोरास काही तासात गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून चोरीच्या गुन्ह्यातील 2 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.अवघ्या १२ तासात पाचोरा न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल करण्यात आले.या आरोपीस न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपीची धुळे सबजेलला रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,दिनांक १८जानेवारी २०२६ रोजी दुपारी १५:२५ वा. चे दरम्यान फिर्यादी  किशोर आनंदराव नरेराव ( वय- ३९ )( रा. ह.मु. कृष्णापुरी, पाचोरा) यांनी त्यांचे चारचाकी गाडीत पॉवर बँकला त्यांचा मोबाईल चार्जिंगसाठी लावलेला असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने मोबाईल चोरी करुन घेवुन गेल्या बाबत पाचोरा पोलिस स्टेशन ला गु.रजि.क्रमांक २१/२०२६ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक १८ रोजी रात्री २१:२३ वा. दाखल करण्यात आलाआहे.
सदर गुन्ह्यांचा अनुषंगाने पाचोरा पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ अशोक रामचंद्र हटकर, पोकॉ शरद मांगो पाटील, पोकॉ संदिप किसन भोई यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्ह्यांचे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तसेच गुन्ह्याचा तपास चालु असतांना संशयीत इसम हा फिरतांना मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सौरभ नाना भिल (गायकवाड) (वय-२५) (रा. कळमसरे, ता. पाचोरा)  असे सांगितले त्यास विश्वासात घेवुन पोलिस ठाणे येथे आणुन त्याची गुन्ह्याचे संदर्भात प्राथमिक चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तसेच पहुर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अशाच प्रकारचा मोबाईल चोरल्याचे कळविल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करुन तपासात त्याने गुन्ह्यात चोरलेले  १५,०००/- रु. किंमतीचा फिकट निळ्या रंगाचा शॉओमी कंपनीचा अँन्ड्राईड फोन त्याचा IMEI No 8671790518504878 अशा वर्णनाचा जु.वा.किं.सु. ५,०००/- रुपये किंमतीचा विवो Y27 Pro अशा वर्णनाचा जु.वा. किं.सु. असा एकुण ३०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र  पाचोरा न्यायालयात अवघ्या १२ तासात पाठविण्यात आले असुन सदर आरोपीस न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आरोपीची धुळे सबजेलला रवानगी करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी बापु रोहम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  राहुलकुमार पवार, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ अशोक रामचंद्र हटकर, सफौ गणेश विरभान पाटील, पोकॉ शरद मांगो पाटील, पोकॉ संदिप किसन भोई यांनी पार पाडली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!