पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या गावाचा तब्बल 4907 खोट्या जन्म नोंदी..

जळगांव-
पारोळा तालुक्यात भाटपुरी गावाचा बोगस आयडी वापरून तब्बल 4,907 खोट्या जन्म नोंदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आंतरराज्यीय रॅकेटचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत केला जाणार असून, माजी खासदार किरीट सोमय्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या ‘भाटपुरी’ गावाचा बोगस आयडी तयार करून तब्बल 4 हजार 907 खोट्या जन्म नोंदी केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत केला जाणार आहे. आमदार अमोल पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या मागणीनुसार ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल घेत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भाटपुरी येथे भेट दिली.बिहारमधील आदर्शकुमार उर्फ विक्की अशोक दुबे या तरुणाने पारोळा तालुक्यात भाटपुरीनावाचे गाव नसतानाही, त्या नावाचा 13 बोगस आयडी तयार केला. 2010 ते 2025 या कालावधीत त्याने या आयडीचा वापर करून 4 हजार 907 बोगस जन्म दाखल्याच्या नोंदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पारोळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



