बदरखे येथे तमाशा बघण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय युवकाचा खून; पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
पाचोरा –
पाचोरा तालुक्यातील बदरखे येथे तमाशा बघण्यासाठी आलेल्या युवकास कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणासांठी कशाने तरी त्याचे पोटावर, पाठीवर व खांद्यावर, मारहाण करून जखमा करून त्यास जीवे ठार मारले असल्याची घटना पाचोरा तालुक्यात उघडकीस आली आहे, याबाबत घटने बाबत फिर्याद मयताचा चुलत भाऊ हनुमंतखेडा तालुका सोयगाव येथील नंदकिशोर पाटील यांनी पाचोरा पोलीसात दिली त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझा चुलत भाऊ मनोज ज्ञानेश्वर निकम (वय २६) हा शेती काम तसेच बाहेरच्या गाडीवर ड्रायव्हींगचे काम करत होता. सध्या दोन ते तीन दिवसांपासुन मयत चुलत भाऊ नामे मनोज निकम हा शेतात त्यांचे गुरे चारण्यासाठी जात होता.
दिनांक २४ डिसेंबर २०२३रोजी दिवसभर मी गावात व घरीच होतो पूर्ण दिवस भरात माझी तसेच मयत चुलत भाऊ मनोज निकम याची भेट झाली नव्हती. तसेच रात्री आम्ही घरातील सर्वजण जेवन वगैरे करून झोपुन गेलो दुसऱ्या दिवशी दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी मी घरी असतांना सकाळी ०७:४२ वाजता मला आमचे गावातील मयत चुलत भाऊ मनोज निकम यांचे शेताचा भागीदार नामे प्रकाश राठोड याचा मला फोन आला की, आम्ही बदरखे यथे यात्रेच्या ठिकाणी आहोत व यात्रेच्या ठिकाणी बदरखे येथे मनोज ज्ञानेश्वर निकम हा जमीनीवर निपचीत पडलेला आहे व त्याची काही एक हालचाल दिसत नाही तरी तु गाडी घेवुन ये असे सांगीतल्याने मी लगेच चुलत काका विजय निकम यांचे फोरव्हीलर गाडीत मी तसेच माझे चुलत काका तुकाराम निकम, विजय निकम असे आम्ही बदरखे ता. पाचोरा येथे सदर ठिकाणी गेलो तेथे गेल्यानंतर चुलत भाऊ मनोज निकम हा यात्रेच्या ठिकाणी तमाशा असलेल्या जागेच्या जवळ पडलेला होता तेथे माझा चुलत भाऊ किरण निकम व इतर लोकांकडुन समजले की रात्री चुलत भाऊ मनोज निकम हा आमचे गावातील पवन उर्फ लकी निकम यांचा सोबत मनोज ची बजाज डिस्कव्हर गाडीने तमाशा बघण्यासाठी आला होता, या बाबत समजले त्यानंतर आम्ही भाऊ मनोज निकम याचे शरीर बघितले असता त्याचे पाठीवर व खांद्यावर जखमा दिसल्या व तो मयत स्थितीत पडलेला दिसला त्यानंतर आम्ही लगेच नगरदेवळा दुरक्षेत्र येथील पोलीसांना सदर घटने बाबत फोन करून माहीती दिली. व तेथे लगेच पोलीस आले तेथे पोलीसांनी मनोज यास तपासुन बघितले व त्यास नंतर लगेच रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे घेवुन आले मी पाचोरा पोलीस स्टेशनला खबर दिल्याने पोलीसांनी मयत भाऊ यांचे मृतदेहाचा पंचनामा केला व शव विच्छेदन होणेबाबत पोलीसांनी रिपोर्ट दिला त्यानंतर वैद्यकीय अधिकारी भाऊ मनोज याची तपासणी करुन सांगीतले की त्याचे उजवा पायाची गुडघ्याखालची नळी तुटलेली आहे व बरगड्या देखील तुटलेल्या आहे, असे सांगीतले तरी तुम्ही मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी घेऊन जा असे सांगितल्याने आम्ही व पोलीस कर्मचारी असे मयतभाऊ याचे मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी घेवुन गेलो तेथे गेल्यानंतर उशीर झाल्याने दुसऱ्या दिवशी दिनांक २६ डिसेंबर २०२३मंगळवार रोजी सकाळी मयत भावाचे शवविच्छेदन करुन मृतदेह अंत्यविधीसाठी आमच्या ताब्यात दिले आहे.
अशी फिर्याद नंदकिशोर पाटील यांनी पाचोरा पोलीसांत दिल्याने भा.द.वी. कलम ३०२ प्रमाणे आज दि.२६ डिसेंबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून सदर घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
आज दि.२६ डिसेंबर रोजी ०४:०० वाजेच्या सुमारास मयतावर शोकाकुल वातावरणात हनुमंतखेडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.