क्राईमजळगाव जिल्हा

राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी दरम्यान पोलीसांनी जप्त केला,७७ लाखांचा गुटखा..

मुक्ताईनगर-

राष्ट्रीय महामार्गावर मुक्ताईनगर पोलीसांनी गुन्हेगारांचा पाठलाग करून तब्बल १ कोटी २ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सहकार्याने स्थानिक गुन्हे शाखा आणि मुक्ताईनगर पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधला. पूर्णाड फाटा येथे नाकाबंदी दरम्यान संशयित आयशर ट्रक (क्र.एम एच ४० सी डी ९३५८) दिसला. पोलीसांनी थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर तरी वाहनचालकाने वाहन न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी साडेअकरा वाजता सारोळा फाट्यावर संशयित ट्रक ताब्यात घेत ट्रकची झडती घेतल्यावर ७७ लाखांचा गुटखा, २५ लाखांचा ट्रक व १२ हजारांचा मोबाईल असा एकूण १ कोटी २ लाख ३३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी ट्रक चालक आशिष राजकुमार जयस्वाल (रा. देवास, मध्यप्रदेश) याला अटक केली असून, ट्रक मालक आशिक खान बुल्ला खान (रा. नागपूर) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, उपनिरीक्षक जयेश पाटील, सोपान गोरे, तसेच सलीम तडवी, छगन तायडे, रतन गीते, मयूर निकम, भरत पाटील, देश पाटील, भाऊराव घेते, अशी तडवी, राकेश धनगर आणि संदीप धनगर यांनी ही कारवाई यशस्वी केली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!