राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यकार्यकारणी मध्ये महाराष्ट्र प्रदेश संघटक- सचिव पदी अनिल महाजन यांची निवड.
मुंबई-
राज्यभरात कुशल संघटन असणारे माळी समाजाचे नेते अनिल महाजन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्यकार्यकारणीत ( संघटक- सचिव) पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही निवड केली असून तशा आशयाचे नियुक्ती पत्र अनिल महाजन यांना प्रदेश कार्यालय मुंबई येथुन पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अतिशय विश्वासू मानले जाणारे अनिल महाजन हे तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील असून सध्या वास्तव्यास मुंबई येथे आहेत. महाजन यांचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात कुशल असे सामाजिक संघटन आहे. राज्याची प्राथमिक व सामाजिक माहिती अनिल महाजन यांना उत्तम माहीत आहे. त्यांची संघटनात्मक ताकद व त्यांचे वक्तृत्व बघून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेश पातळीवर मुख्य कार्यकारणी मध्ये काम करण्याची संधी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच नाथाभाऊ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेत अनिल भाऊ महाजन यांच्या कुशल संघटनांचा नक्कीच फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल या दृष्टिकोनातून अनिल महाजन यांना प्रदेश पातळीवर मुख्य कार्यकारिणीत राज्य संघटक -सचिव ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे पक्षातून व ग्रामीण भागातून अनिल महाजन यांचे अभिनंदन होत आहे.