जळगाव जिल्हा

श्री राष्ट्रीय राजपूत करणीसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती भुसावळ शहरात उत्साहात साजरी

भुसावळ-

दिनांक 19 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती श्रीराष्ट्रीय राजपूत करणी सेने च्या पदाधिकाऱ्यांनी साजरी केली सर्वप्रथम श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी महाराज्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्या नंतर आपल्या संभाषणात दामोदर राजपूत यांनी घराघरात शिवाजी राजे घडवा या विषयावर संभाषण केले.

तसेच जिल्हा अध्यक्षा सारिकाताई राजपूत यांनी आपल्या भाषणात प्रत्येक आई ने आपल्या पोटी आलेल्या मुलाला शिवबा सारखे संस्कार द्यावेत,या विषयावर भाष्य केले भाषण संपल्यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वदंन केले. या प्रसंगी जिल्हा युवक अध्यक्ष संदीप राणा, महिला अध्यक्षा सारिकाताई पाटील, जिल्हा सचिव मीनाताई राजपूत जेष्ठ समाजसेवक दिलीपसिंग पाटील, आनंदा पाटील सुनील पाटील,दलजीत चौधरी, प्रशांत ठाकूर, चंदूभाऊ चौहान,पवन मेहरा,भुषण राजपूत,गणेश राजपूत,वैशाली सावकारे, संध्या चौधरी, विजय राजपूत, तालुका अध्यक्षा कविता राजपूत, प्रमिला राजपूत, भाग्यश्री राजपूत, सविता राजपूत, संगीता राजपूत,प्रियंका राजपूत, सविता मोरे,अर्चना राजपूत, प्रतीक्षा राजपूत,श्रद्धा राजपूत, उज्वला राजपूत, गायत्री राजपूत, सपना राजपूत,आदी समाज बांधव उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!