जळगाव जिल्हा

पाचोरा नगरपालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी किशोर बारवकर नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्याकडून एक महिन्यासाठी प्रभारी जबाबदारी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार निर्णय


पाचोरा-


पाचोरा नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांच्याकडे पुढील एक महिन्यासाठी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नगराध्यक्षा सुनीता किशोर आप्पा पाटील यांनी काही कौटुंबिक  कारणांमुळे पालिकेच्या कामकाजासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नसल्याने हा निर्णय घेतला आहे.पाचोरा नगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीदरम्यान उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांची प्रभारी नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात नगराध्यक्षा सुनीता पाटील यांनी अधिकृत पत्र देऊन एक महिन्याच्या कालावधीसाठी पालिकेची दैनंदिन कामे पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार आणि नगराध्यक्षा सुनीता पाटील यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला.पालिकेच्या कामकाजात राहणार सातत्य नगरपालिकेचा कारभार सुरळीत चालावा, नागरिकांची दैनंदिन कामे प्रलंबित राहू नयेत तसेच शहरातील विकासकामे आणि प्रशासकीय कामकाजात खंड पडू नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. एक महिन्याच्या कालावधीत किशोर बारवकर हे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सांभाळणार आहेत.किशोर बारवकर यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या या जबाबदारीमुळे नगरपालिकेच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः शहरातील नागरिकांच्या समस्या, मूलभूत नागरी सुविधा, प्रलंबित कामे आणि विकासकामांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.नगराध्यक्षा सुनीता पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत दैनंदिन कामकाजाची जबाबदारी उपनगराध्यक्षांकडे सोपविल्याने पालिकेच्या कामकाजात समन्वय आणि सातत्य राखण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येत आहे.एक महिन्याच्या या कालावधीत किशोर बारवकर यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा नगरपालिकेचा दैनंदिन कारभार कशा पद्धतीने चालतो आणि शहराच्या विकासकामांना किती गती मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चौकट – आमदार किशोर आप्पा पाटील,नगराध्यक्षा सुनीता पाटील गटनेते सुमित पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा पालिकेत सुरू असलेली विकासाची घोडदौड कायम राहणार असून माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांवर पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास मी कामातून सार्थ करून दाखवणार आहे
किशोर बारवकर
प्रभारी नगराध्यक्ष ,पाचोरा

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!