जळगाव जिल्हा

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन; 29 वाहनांवर कारवाई;3 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त.


पाचोरा-

दिवसेंदिवस नागरिकांच्या वाढत्या तक्रारी च्या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातील मौजे कुरंगी येथील गिरणा नदीपात्रात दिनांक 18/09/2026 रोजी सकाळी 05.00 वाजेच्या सुमारास महसूल विभाग, पोलीस विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे  अनाधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक करणा-या 29 वाहनांवर पहिल्यांदाच मोठी धडक कारवाई करण्यात आली असून 3 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाई ने तालुक्यात खळबळ उडाली आहे.सदर कारवाई दरम्यान गिरणा नदीपात्रात उत्खनन/वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली एकूण 29 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. सदरील कारवाई पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,  पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे,जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,भडगाव पोलिस निरीक्षक  व पाचोरा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे,पिंपळगाव(हरेश्वर) सहा. पोलीस निरीक्षक  कल्याणी वर्मा,निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, मंडळ अधिकारी आर.डी. पाटील, मंडळ अधिकारी नांद्रा श्रीमती वैशाली पाटील, मंडळ अधिकारी कुऱ्हाड खुर्द भरत नन्नावरे, मंडळ अधिकारी पिंपळगाव बु. प्रकाश डहाके, मंडळ ‘अधिकारी नगर देवळा बु. राहुल पवार असे एकुण 5 मंडळ अधिकारी, पहुर पोलीस स्टेशन, बोदवड पोलीस स्टेशन व त्यांचे अंतर्गत कर्मचारी व मंडळ अधिकारी, तहसिल कार्यालय, पाचोरा, ग्राम महसूल अधिकारी पाचोरा व भडगाव यांचे पथकाने केली आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांबाबत नियमानुसार पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून, संबंधितांविरुद्ध प्रचलित महसूल व इतर लागू कायद्यांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.गिरणा नदीपात्रातील अवैध उत्खनन व वाळू वाहतुकीस आळा घालण्यासाठी महसूल विभागामार्फत यापुढेही नियमितपणे तपासणी व कारवाई करण्यात येणार आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!