जळगाव जिल्हा

वृंदावन हॉस्पिटलचा वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन;

पाचोरा-

पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वृंदावन हॉस्पिटल मल्टिस्पेशालिटी सेंटर, पाचोरा येथे गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वृंदावन फाउंडेशन, पाचोरा व राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पिंपळगाव (हरे.) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मोहनराव नारायण नेत्रालय, नांदुरा यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात येणार असून.या शिबिरात जर्मन मशीनद्वारे नेत्र तपासणी करण्यात येणार असून, मोतीबिंदूचे निदान व उपचारासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केवळ २,५०० रुपयांच्या अल्पदरात करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.

या उपक्रमामुळे आर्थिक परिस्थितीमुळे डोळ्यांची तपासणी किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुढे ढकलणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डॉ. निलकंठ नरहर पाटील यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रेल्वे उड्डाणपुलाजवळील वृंदावन हॉस्पिटल, पाचोरा येथे हे शिबिर होणार आहे.

शिबिरासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क :

– विकास लोहार – ९५६१७२६१४०
– प्रसाद लोखंडे – ९५९५६७५६३२
– सचिन खरे – ८६५७८०९९६०

पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वृंदावन मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटलचे संचालक डॉ निलकंठ पाटील यांच्याकडून करण्यात येत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!