जळगाव जिल्हा

जळगाव येथे पोलीस भरती साठी येणा-या उमेदवारांची जिल्हा पोलीस दलातर्फे रात्रीच्या राहण्याची केली व्यवस्था.


जळगाव-

राज्यात पोलीस दलात विवीध संवर्गातील पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. जळगाव पोलीस दलात १३७ पोलीस शिपाई पदाकरीता दिनांक १९/०६/२०२४ पासून भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर सुरु झालेली आहे.

जळगाव शहरात पोलीस भरती करीता शाररिक व मैदानी चाचणीस बाहेरगावाहुन
येणा-या उमेदवारांची गैरसोय टाळण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक सो. यांनी पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानाजवळील मंगलम हॉल व मल्टीपर्पज येथे मोफत रात्रीची राहण्याची व्यवस्था केलेली आहे.

तरी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे मा. पोलीस अधीक्षक सो. यांनी पोलीस भरती करीता बाहेरगावाहुन येणा-या उमेदवारांना आवाहन केले आहे की, त्यांनी पोलीस मुख्यालयातील पोलीस कवायत मैदानाजवळील मंगलम हॉल व मल्टीपर्पज हॉल येथे केलेल्या रात्रीच्या राहण्याच्या व्यवस्थेचा
लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!