कै.पि के शिंदे विद्यालयात कलाविष्कारांचा स्नेहमेळा
पाचोरा-
येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित कै.पि.के. शिंदे माध्यमिक विद्यालयात नुकताच विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. बापूसाहेब सतीश शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रसंगी गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कलागुणांचा भरभरून आनंद घ्यावा असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव भैयासाहेब ॲड. जे.डी. काटकर, उपाध्यक्ष नीरज मुणोत, युवा नेते अमोल भाऊ शिंदे, सहसचिव प्रा.शिवाजी शिंदे, माजी नपा सदस्य सिंधुताई शिंदे, केंद्रप्रमुख अभिजीत खैरनार, मुख्याध्यापिका पूजाताई शिंदे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, ऍड. ललिता पाटील , बापूसाहेब दिगंबर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात उपाध्यक्ष नीरज भाऊ मुणोत, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन केले.
या स्नेहसंमेलनाच्या रंगमंचावर विविधनृत्य मूक अभिनय, पोवाडा ,गीत गायन आधी कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
” मेरे घर राम आयेंगे, अफजलखान चा वध, महाभारत , मणीकर्णीका, क्लासरूम इत्यादी बहारदार कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. व्ही. गीते यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत टोणपे व विद्यार्थिनी अवनी, चैताली, सृष्टी, देवयानी,स्पर्श, प्रथम, रितेश, यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्रीमती एस. एस. ताड यांनी केले. कार्यक्रमासाठी स्नेहसंमेलन समिती चे सदस्य जी. व्ही. सोमवंशी, श्रीमती जे डी आहेर , व्हीं. पी. देशमुख, श्रीमती वैशाली भालेराव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.