दादासाहेब इंग्लिश स्कूल व ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल चा वतीने. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.
मुखेड (प्रतिनिधी बालाजी साधू)
दिनांक 27 जानेवारी २०२४ रोजी बाराळी येथील दादासाहेब इंग्लिश स्कूल बाराळी व ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल आतनूर यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन बाल श्री राम वेशभूषा केलेल्या बालकाचा हस्ते रेबीन कापून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती अतनूर गावचे सरपंच चंद्रशेखर पाटील गव्हाणे बाराळीचे तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत वाडीकर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तांबोळी शेख जाकीर हुसेन दोन राम पाटील अस्वले पोलीस पाटील शंकर वाघमारे हनुमान मंदिराचे विश्वस्त नाना पाटील इंगळे मरसांगवीचे चेअरमन उमा पाटील इंगळे अनिल पाटील कोठारे भगवान पाटील इंगळे समस्त गावकरी शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे संयोजक दोन्ही शाळेचे संस्थाचालक संचालक इशा तांबोळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस हे उपस्थित होते.