पाचोर्यात खास शिक्षकांसाठी नृत्य महोत्सव चे आयोजन : नाव नोंदणीचे आवाहन
पाचोरा-
“निशंक” महाराष्ट्र (एनजीओ) व “जॅक्सन डान्स अकॅडमी” पाचोरा -भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा- भडगाव तालुक्यातील शिक्षकांसाठी “नृत्य महोत्सव- 2024” चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार , दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत श्री शेठ एम. एम.महाविद्यायाच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आलेल्या या नृत्य महोत्सवासाठी नाव नोंदणीचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
खास शिक्षकांसाठी आयोजित या नृत्य महोत्सवात देशभक्तीपर गीते , समाज प्रबोधनात्मक व शिक्षण विषयक तसेच लोकनृत्यसह जागतिक व सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या विषयांवरील नृत्य कलाविष्काराला संधी देण्यात येणार आहे.
अष्टपैलू शिक्षकांच्या नृत्यकलेला वाव देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धा तीन गटात होणार असून पहिल्या गटासाठी पिटीसी संचालक खलील दादा देशमुख , दुसऱ्या गटासाठी पि.टी.सी. शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ हे प्रायोजक आहेत. तर तिसऱ्या गटातील प्रथम क्रमांकाला आमदार किशोर आप्पा पाटील द्वितीय क्रमांक आयोजकांकडून आणि तृतीय क्रमांकासाठी गट शिक्षणाधिकारी समाधान पाटील साहेब हे प्रायोजक आहेत.
पहिला गट – वैयक्तिक (सोलो) नृत्याला प्रथम बक्षीस 3000, द्वितीय 2000 , तर तृतीय 1000 रुपये बक्षीस देण्यात येईल. दुसरा गट – ड्यूट (युगल) नृत्यासाठी प्रथम बक्षीस 5000, द्वितीय 3000 व तृतीय बक्षीस 2000 रुपयांचे ठेवण्यात आले आहे. तिसरा गट – समूह (ग्रुप)नृत्यासाठी प्रथम बक्षीस 10000 रुपये, द्वितीय बक्षीस 7000 रुपये आणि तृतीय बक्षीस 5000 रुपयांचे देण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी : मानव सर -72 18 70 78 62 , अमोल सर- 90 82 20 53 49, भैय्यासाहेब सोमवंशी सर -75 88 05 31 02 आणि राजेंद्र भिमराव पाटील सर – 94 21 52 23 34 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.