नेरी पोलीस दूरक्षेत्राची प्रतिक्षा संपली मंत्री.ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण.
नेरी तालुका जामनेर-
जामनेर तालुक्यातील नेरी पोलीस दुरक्षेत्रासाठी नवीन इमारत असावी यासाठी पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत होते.तब्बल 113 वर्षांनी नेरी पोलीस दुरक्षेत्राची नवीन इमारत बांधून पूर्ण झाली असून पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचा पाठपुराव्यामुळे नव्या इमारतीचे लोकार्पण मंत्री.ना.गिरीष महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,नेरी पोलीस दुरक्षेत्राची इमारत ही जीर्ण झालेली होती.सदरील नेरी औट पोस्ट अंतर्गत जवळपास 16 गावांचा समावेश आहे. याठिकाणी पोलीस स्टेशन ची स्वतंत्र व नवीन इमारत असावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते.स्वातंत्र्य काळापासून नेरी औट पोस्ट ची इमारत तग धरून होती.जामनेर तालुक्याशी संलग्न असलेल्या या औट पोस्ट च्या इमारतीसाठी असंख्य पोलीस निरीक्षकांनी पाठपुरावा केला परंतु सगळे प्रयत्न असफल ठरले.जामनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी या बाबतीत शासन दरबारी पाठपुरावा करत या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी नवीन इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता आणि काही महिन्यातच या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केलेला संकल्प पूर्णत्वास आला आहे.आज रोजी या नवीन इमारतीचे लोकार्पण मंत्री.ना.गिरीष महाजन यांच्या सह पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. सदर इमारतीचे बांधकाम हे प्लास्टिक पाईप, प्लास्टिक फर्निचर आणि इतर प्लास्टिक उत्पादने तयार करणारी भारतातील सुप्रिम कंपनीच्या सी.एस.आर.निधी मधून करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. सुप्रिम कंपनीच्या सी.एस.आर.फंडातून कंपनीने यापूर्वी जळगाव शहरात, जामनेर तालुक्यात अनेक लोकाभिमुख काम केले आहे. त्या शृंखलेचा एक भाग म्हणून जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या,नेरी औट पोस्टची नवीन इमारत बांधून,जामनेर पोलीस स्टेशनला हस्तांतरित करून लोकार्पण केले.
सदरील नेरी औट पोस्ट अंतर्गत जवळपास 16 गावांचा समावेश आहे.नवीन इमारत झाल्यामुळे जामनेर पोलीस स्टेशनच्या नेरी औट पोस्ट अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक यांना खूप चांगल्या प्रकारे अत्याधुनिक सुविधा मिळाली असून पोलीस प्रशासनाला अत्यंत उपयुक्त अशी सुविधा उपलब्ध झाली आहे.
जवळपास 113 वर्षानंतर नेरी पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यालयीन इमारतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम झाले आहे.
सदरील नेरी औट पोस्ट च्या नवीन इमारतीचे लोकार्पण, महाराष्ट्र शासनाचे पाणीपुरवठा आणि पर्यावरण मंत्री.ना.गिरीष महाजन यांचे हस्ते झाले.याप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री.एम.राजकुमार,चाळीसगाव अपर पोलीस अधिक्षक श्रीमती.कविता नेरकर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरूळे,जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे,पोलीस उपनिरीक्षक श्री.अहिरे,सागर काळे,पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि जामनेर पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी तसेच सुप्रिम कंपनीचे`जी.के सक्सेना,संजय प्रभूदेसाई,धनंजय जेऊरकर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.