चंद्रवट खर्ची येथे होणार आई सप्तश्रृंगी चा जन्मोत्सव साजरा.
चंद्रवट खर्ची ता.एरंडोल-
नऊ हजार वर्षांनंतर त्रिगुणात्मक आदिशक्ती भगवती आई सप्तश्रृंगी अवताराचे तसेच भगवती चे मुळ माहेर, वेद पुराणाधार, संशोधन सानिध्याने, यंदा देवीच्या माहेरी खान्देशात अतिमहापावन तिर्थक्षेत्र खान्देशातील आई सप्तश्रृंगी मातेचे जन्मठिकाण, खान्देशमाहेर,(सिद्ध चंद्रवट ) खर्ची ता.एरंडोल जि. जळगाव येथे माघ शुद्ध सप्तमी दिनांक 16 फेब्रुवारी 2024 शुक्रवार रोजी आई सप्तश्रृंगी च्या अवतारास 9000 नऊ हजार वर्षे पुर्ण होत आहे.
या निमित्ताने देवी जन्मस्थळी,खर्ची येथे दिनांक 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत दोन सत्रात विविध कार्यक्रमासह आंतरराष्ट्रीय किर्तन गौरव महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
आई सप्तश्रृंगीचे खान्देशातील माहेर पिठाधिश्वर अनंत विभुषित श्री श्री 1008 वेद वेदांत शास्त्री आचार्य श्री महामंडलेश्वर, आठरा पुराणं कथाकार स्वामी माधवानंद सरस्वती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय किर्तन सोहळा सप्ताह आयोजित करून देवीचा जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे.
तरी या महा सप्ताहामधील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध,
आई सप्तश्रृंगी गडावर जाणारा शिरपूर चा मानाच्या रथाचे मानकरी व श्री कानबाई माता आणि आई सप्तश्रृंगी चे सुपरहिट गीतांचे निर्माते व गायक
आबा चौधरी धिरज चौधरी खान्देश किंग ग्रुप बजरंग बॅण्ड शिरपूर यांचा संगीतमय देवी भक्ती गितांचा कार्यक्रम दि.11/02/2024 रविवार रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमाचे डिजिटल मिडीया फेसबुक,यु ट्यूब, ईन्स्टाग्राम ,टिव्ही चॅनलच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.
सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की, या स्वर्णिमक्षणांचा तन मन धनाने देवी भक्तीचा रसिक भाविकांनी सुवर्ण योग प्राप्त करून या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वेदांत शास्त्री आचार्य श्री महामंडलेश्वर , स्वामी माधवानंद सरस्वती महाराज
खर्ची आश्रम संपर्क,
मो.8329645033