राष्ट्रीय सेवा योजना चे शिबिर सक्षम नागरिक घडविण्याचे व्यासपीठ- नानासाहेब संजय वाघ
पाचोरा-
पाचोरा येथील खडकदेवळा खुर्द येथे श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष हिवाळी शिबिराचा समारोप समारंभ संपन्न झाला यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना विभगाचे विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर म्हणजे देशासाठी सक्षम नागरिक घडविण्याचे व्यासपीठ आहे विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लावून,स्वच्छता,नीटनेटकेपणा,मानवताधर्म,राष्ट्रप्रेम,राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा या सर्व मूल्यांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून होत आहे.
यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय यासाठी प्रयत्नशील असते. महाविद्यालयातून या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागातून आजपर्यंत अनेक विद्यार्थी राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करत आहे यातून प्राध्यापक,डॉक्टर,इंजिनिअर याबरोबरच राज्य आणि देशाच्या प्रशासन विभागाच्या विविध उच्च पदावर अनेक विद्यार्थी जाऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे याही पुढे विद्यार्थ्यांनी यशाची उंच शिखरे गाठावी त्यासाठी संस्था व महाविद्यालय परिवार सतत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहील असे आश्वासनही पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी दिले. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे व्हा.चेअरमन नानासाहेब व्ही.टी जोशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब खलील देशमुख उपस्थित होते खलील देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी जात,धर्म,पंथ असा भेदभाव न करता मानवता हाच सर्वोच्च धर्म मानून समाजाच्या हिताचे कार्य करावे व राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावावा यावेळी असे मत मांडले,तर व्ही.टी जोशी यांनीही अध्यक्षीय भाषणातून विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असते विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हावा व यशाची शिखरे त्यांनी गाठावी यासाठी सतत प्रयत्न विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग कार्यरत असतो व विविध योजना विद्यार्थ्यांसाठी राबवत असतो यावेळी खडकदेवळा खुर्द येथील नागरिक गजानन मंगरुळे, मा.सुदाम वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले तर विद्यार्थ्यांमधून गायत्री क्षीरसागर,समाधान कलमे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर बी एस पाटील,उपप्राचार्य डॉ वासुदेव वले,सरपंच उषा सुदाम वाघ,रमेश शेलार,कपूरचंद तेली,श्रावण गायकवाड, हनीप शेख,रवींद्र शिंदे,जितेंद्र पाटील,शरद पाटील,अजित चौधरी,गणेश तेली,गोविंद परदेशी,बापू पाटील,डॉ जे डी गोपाळ,डॉ,के एस इंगळे,डॉ एस बी तडवी, प्रा.वाय बी पुरी,डॉ माणिक पाटील,डॉ शरद पाटील,डॉ शारदा शिरोळे,प्रा.सुवर्णा पाटील, प्रा.अमित गायकवाड,प्रा.मेघा मराठे,प्रा.महेंद्र मिस्तरी,प्रा.सुनिल पाटील,रवी कदम, सतीष पाटील आदी सर्व उपस्थीत होते.कार्यक्रमानंतर वृषारोपण करण्यात आले कार्यक्रमासाठी विद्यार्थी,विद्यार्थिनी,गावातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेश वळवी यांनी केले सुत्रसंचलन प्रा.स्वप्निल भोसले यांनी तर आभार डॉ क्रांती सोनवणे यांनी मानले.