त्या मयताची ओळख पटली
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील गाळण स्टेशन जवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना दिनांक 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती, त्यातील मयताची ओळख पटवण्याचे काम सुरू होते त्यात सदर इसमाची ओळख पटली असून तो पाचोरा तालुक्यातील गाळण येथीलच रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश डिगंबर पाटील वय 55 वर्ष असे मयताचे नाव आहे, शेती व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ते चालवीत होते, मयताचे पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून या घटनेचा पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.
•काय होती घटना-पाचोरा तालुक्यातील गाळण स्टेशन जवळीलच खांबा किलोमीटर क्रमांक 361/2-361/04 दरम्यान 55 वर्षीय अज्ञात इसम मृत अवस्थेत रेल्वे विभागाचे इंजिनियअरिंग विभागाचे कर्मचारी ट्रॅकमन बानासूर मिना यांना दिसून आल्याने त्यांनी याबाबतची माहिती पाचोरा लोहमार्ग दूरक्षेत्राला कळविताच लोहमार्ग दूरक्षेत्राचे पोलीसांनी रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली होती, सकाळी घटनेचा पंचनामा पोलीस हेडकॉन्स्टेबल मधुसूदन भावसार यांच्यातर्फे करण्यात आलेला होता, सदर घटनेतील मयताचा मृतदेह चालक अमोल पाटील यांचे मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णाला दाखल करण्यात आलेला होता, या घटनेचा तपास व मयताची ओळख पटविण्याचे काम लोहमार्ग दूरक्षेत्राचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मधुसुधन भावसार हे करीत होते.