पाचोरा!२०फेब्रुवारी पासुन समस्त राजपूत समाजाच्या वतीने आमरण उपोषणास होणार सुरवात.
पाचोरा-
समस्त राजपूत समाज महाराष्ट्र च्या वतीने पाचोरा तहसीलदार, पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले असून सदर निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,२ऑक्टोबर पासून सहा दिवस जळगाव कलेक्टर ऑफिस येथे मी आमरण उपोषण केले होते त्यावेळेस भडगाव पाचोरा तालुक्याचे आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी आठ दिवस मध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापना करतो असे आश्वासन दिले होते. परंतु त्यावर काहीच केले नाही.
अधिवेशना मध्ये मा.आमदार श्वेताताई महाले यांनी महामंडळाचा प्रश्न उपस्थित केल्यावर 15 जानेवारीच्या आत करतो असे माननीय मंत्री अतुलजी सावे यांनी सांगितले त्यावर सुद्धा काहीच केले नाही. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कागदपत्रे पूर्ण असल्यावरही अधिकारी राजपूत भामटाचे जातीचा दाखला रिजेक्ट करतात. याचा अर्थ असा कि राजपूत समाज महाराष्ट्र मध्ये राहत नाही का ? राजपुत समाज गप्प बसणार नाही आमरण उपोषण करून शांततेच्या मार्गाने न्याय मिळवून होईल.
तरी येत्या 20 फेब्रुवारीला पाचोरा तहसिलदार साहेबांच्या कार्यालया बाहेर आमरण उपोषण करीत आहे. पुन्हा आमरण उपोषण करण्याची वेळ ही महाराष्ट्रातील मंत्रीनीच राजपूत समाजावर आणली आहे.
ह्या आशयाचे निवेदन दिले आहे सदर निवेदन देते वेळी खांन्देश युवा अध्यक्ष सुशांतसिंग राजपूत, यांच्या वतीने निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी, पाचोरा तालुका अध्यक्ष महेंद्रसिंग राजपूत . जितेंद्रसिंग परदेशी, रावसाहेब राऊळ सर ,भडगांव तालुका उपाध्यक्ष सुनील राजपूत,विश्व हिंदु परिषद प्रखंड सह मंत्री, दिपक राजपूत,विलास राजपूत,सूर्यभान राजपूत,सरदारसिंग राजपूत गोलू राजपूत ,सागर राजपूत,अनिल भाऊ सावळे,आदी समस्त राजपूत समाज बांधव उपस्थित होते.