राज्य

ओबीसी नेते छगन भुजबळांची घेतली सोनार समाज शिष्टमंडळानी भेट;ओबीसी आणि सोनार समाजाशी निगडित विविध विषयांवर झाली सकारात्मक चर्चा

नाशिक-

दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ ते १:४० दरम्यान सकल भारतीय सोनार समाज संघटन चे सेतुबंधन मध्ये समाविष्ट असलेल्या सोनार समाजाचे ढाण्या वाघ तसेच ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष गजुभाऊ घोडके, राजाभाऊ सोनार, दिलिपतात्या देवरे, युनिव्हर्सल विश्वकर्मा फाउंडेशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतारामशेट दुसाने, प्रदिप सोनवणे,युवा सोनार सराफ व्यावसायिक प्रसाद संजयशेट मंडलिक या शिष्टमंडळाने ओबीसी नेते श्री छगनराव भुजबळ यांची नाशिक येथील भुजबळ फार्म हाऊस वर ओबीसी आरक्षण अस्तित्वाची लढाई आणि सोनार समाजाशी निगडित विविध विषयांवर चर्चा केली.ना. छगनराव भुजबळ यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेताना ओबीसी आरक्षण अस्तित्वाचे लढाईसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या नाशिक येथील सोनार समाजाचे लढवय्ये कार्यकर्ते आणि ढाण्या वाघ गजुभाऊ घोडके यांचे विशेष कौतुक करतांना त्यांच्या पाठीशी सर्व शाखीय सोनार समाज असल्याचे कळताच त्यांना विशेष आनंद वाटला.
यावेळी तब्बल ४० मिनिटे झालेल्या चर्चेत सोनार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत देखील जाणून घेतले. स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानचे शिल्पकार आणि वादातीत द्रष्टा विकासपुरुष नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला देण्यात यावे, संपूर्ण भारतातील सर्व रेल्वे टर्मिनस वर नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे तैलचित्र लावण्यात यावे, सोनार समाजातील व्यावसायिक आणि सराफांवर चोरीचे खोटे आरोप ठेवून होणाऱ्या कारवाईतून सोनार व्यावसायिक आणि सराफांची सोडवणूक व्हावी, पंढरपूर येथील श्री पांडुरंग मंदिरात हरिहर ऐक्य साक्षात्कार दिनी सोनार समाजा ला महाआरतीचा मान मिळावा, संत शिरोमणी श्री नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ चे मागणीसाठी सर्व ओबीसी समाज आपल्या पाठीशी राहील, असे आश्वासन देतानाच ओबीसी एल्गार सभांमध्ये सोनार समाजाला व्यासपीठावर अवश्य प्रतिनिधित्व दिले जाईल, सोनार समाज हा ओबीसी प्रवर्गातील महत्त्वाचा घटक असून, त्याकडे आम्ही कधीही दुर्लक्ष करणार नाही, शिधा पत्रिका विषयक सोनार समाजातील कुटुंबांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी योग्य त्या यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाईल, असेही भुजबळ यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!