क्राईमजळगाव जिल्हा

अखेर तारखेडा प्रकरणातील ३०२ मधील आरोपींच्या पाचोरा पोलीसांनी आवळ्या मुसक्या.

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील पठाण नामक इसमाचा तारखेडा येथे कपाशीची गाडी मागे पूढे घेण्याच्या वादावरून त्या व्यापाऱ्याने त्या इसमाच्या डोक्यात फरशी मारुन गंभीर जखमी केले असता त्या इसमाचा जळगाव येथील रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला त्या इसमावर शोकाकुल वातावरणात दिनांक १७ शनिवार रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यामुळे आरोपीवर भा.द.वी. कलम ३०२ सह अन्य कलमा अंतर्गत पाचोरा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचे आरोपी फरार होऊन गेले असता यावेळी तात्काळ चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना आरोपीस अटक करण्याबाबत सुचना दिल्यात त्यांनी साहय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस कर्मचारी विश्वास देशमुख व संतोष राजपूत यांना योग्य सूचना मागदर्शन देऊन आरोपीस अटक करण्यासाठी सूचना केल्या असता नुकतेच चाळीसगाव येथून बदलून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे व पोलीस कर्मचारी विश्वास देशमुख यांनी चाळीसगाव येथे पोलीस स्टेशनला काम केलेले असून त्यामुळे त्यांना चाळीसगाव परीसरातील माहिती होती त्यामुळे त्यांनी आरोपीचे लोकेशन घेऊन तसेच गुप्त पद्धतीने माहिती काढून आरोपी हा चाळीसगाव येथे असून त्याला अटक करण्यासाठी श्री धरमसिंग सुंदरडे, विश्वास देशमुख, संतोष राजपूत आरोपीची गुप्त माहिती घेऊन त्याला चाळीसगाव येथे शिताफीने अटक केली मुख्य आरोपीस अटक करण्यास पोलीसांना यश आले. आरोपीस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असुन या बाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहे.

पाचोरा पोलीसांनी केलेल्या उत्तम कामगिरी मुळे परीसरातुन अभिनंदन होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!