पाचोऱ्यात रिपाईची आढावा बैठक संपन्न.
पाचोरा-
महाराष्ट्रात आगामी होणाऱ्या लोकसभा तथा विधान सभेच्या निवडणूकीचे येत्या मार्च-एप्रिल-२०२४ मध्ये बिगुल वाजण्याचे संकेत दिसून येत आहे. त्या अनुषंगाने मा. ना. रामदासजी आठवले सामाजिक न्याय मंत्री, भारत सरकार तथा (राष्ट्रीय अध्यक्ष रिपाई) यांनी सर्व पदाधिकारी यांना गांव तेथे शाखा व तालुका तेथे कार्यालय उभारण्याच आदेश दिलेले आहेत. तसेच पक्ष संघटन वाढीसाठी येत्या १० /मार्च २०२४ रोजी तालुक्यात महामेळाव्याचे आयोजन करायचे असून त्या पूर्वतय्यारी साठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या बैठकीचे आयोजन पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, युवा तालुका अध्यक्ष भैय्या बागवान, महिला आघाडी तालुकाअध्यक्ष सौ. प्रियंका सोनवणे, विभागीय अध्यक्ष- संदीप चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष गुरुदास भालेराव, शशिकांत मोरे, रमेश सुरवाडे, प्रकाश भिवसने, सतोष, मोरे, साहेबराव साळवे, सुनील जावळे, आदी या बैठकीला उपस्थित होते बैठकीच्या शेवटी तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, भैय्या बागवान यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार मानून बैठक संपन्न. झाली असे घोषीत केले.