Blog

खेडगाव नंदीचे पोळ्याचा मान रामजी बारकू अहिरराव यांना प्रधान!

पाचोरा (संपादक कुंदन बेलदार)

पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील पोळ्याच्या सणाला दिवाळी सारखे महत्व असून वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. याठिकाणी सालाबाद प्रमाणे खेडगाव नंदीचे येथील मारीमाता मंदिराजवळ गावच्या प्रवेश द्वारावर तोरण बांधण्यात येते. यामध्ये जो शेतकरी याठिकाणी मोठी बोली बोलेल त्या शेतकऱ्याला हा मान दिला जातो व त्याच शेतकऱ्याचा बैल सर्वात आधी तोरण पार करून पुढे जातो.

आज दि. १४ सप्टेंबर २०२३ रोजी पोळ्याच्या दिवशी गावातील रहिवाशी असलेले रामजी बारकू अहिरराव यांनी सर्वात मोठी बोली १५ हजार एक बोलून यंदाचा २०२३ चा मान घेतलेला असून याबाबत आयोजकांच्या वतीने मान घेणाऱ्या अहिरराव यांचे अभिनंदन केले आहे. मान घेणाऱ्या मंडळींकडून मिळालेल्या पैसे हे गावातील मंदिरासाठी देणगी म्हणून दिली जाते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पोळा हा सण खेडगाव नंदीचे येथे आनंदात साजरा झालेला आहे. उद्या दि.१५ सप्टेंबर २०२३ रोजी होणाऱ्या यात्रेमध्ये तमाम आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मरी माता मंदिरामध्ये दर्शनासाठी यावे असे आवाहन यात्रा नियोजन समितीच्या वतीने तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पितांबर पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी,सरपंच,उपसरपंच,सदस्य,शेतकरी व्यापारी तसेच गावातील शेतकरी व युवा वर्ग तसेच महिला माता भगिनी याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असून गावातील पोलीस पाटील तसेच पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!