भडगांव येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल चे उपकार्यालय सुरु करण्यात यावे एकलव्य संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
पाचोरा-
दिनांक ५ मार्च मंगळवार रोजी पाचोरा तहसील प्रविण चव्हाणके, व उपविभागीय अधिकारी भुषण अहीरे यांना एकलव्य संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.सदरच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनातर्फे जळगांव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल सुरु असुन हे जिल्ह्याच्या एका बाजुला असुन त्या कार्यालयात सदर योजनांचा लाभ घ्यायला जाण्यासाठी भरपुर लांबचा पल्ला गाठावा लागतो तसेच एका कामासाठी चार ते पाच फेऱ्या त्या यावल येथील कार्यालया भोवती माराव्या लागतात व त्यासाठी आम्हा सर्व आदिवासींवर आर्थिक भार देखील येतो. त्यामुळे सदर कार्यालयाचे उप कार्यालय आम्हा सर्व आजु बाजुचे तालुक्यातील म्हणजेच चाळीसगांव, पाचोरा, पारोळा, एरंडोल, धरणगांव, अमळनेर, जळगांव, ह्या सर्व तालुक्यातील आदिवासींसाठी भौगोलीकदृष्टया सोयीचे असलेले भडगांव शहरात सुरू करण्यात यावे अशी आम्ही या निवेदनाद्वारे आपणाकडेस मागणी करीत आहोत. तसेच ह्याच विषयावर पाचोरा, भडगांव विधानसभा आमदार महोदय यांनी देखील विधानसभेच्या अधिवेशनात जळगांव लोकसभा क्षेत्रातील आदिवासी बांधवांची गैरसोय पाहता हि मागणी केली आहे. त्या अनुसार आपण मा. ना. मुख्यमंत्री साो., महाराष्ट्र राज्य, मुंबई व मा. ना. आदिवासी विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना सांगून भडगांव येथे लवकरात लवकर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करावे या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदन देते वेळी एकलव्य संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधाकरभाऊ वाघ, तालुका अध्यक्ष गणेश वाघ जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे,रवी सोनवणे, भडगाव तालुका अध्यक्ष दशरथ मोरे, रोहीदास जाधव,कैलास सोनवणे,बबन मोरे,संतोष महाले, ईश्वर ठाकूर, गणेश भील, यांच्या सह एकलव्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.