उद्या भडगाव येथील आरटीओ कार्यालयाचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन उपस्थित राहण्याचे आवाहन.
भडगाव-
भडगाव येथे मंजुर झालेले आरटीओ कार्यालयाचे उद्या दिनांक 7 मार्च 2024 गुरुवार रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणुन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, परीवहन आयुक्त विवेक भिमनवार उपस्थित राहणार आहेत. पाचोरा रस्त्यावर हे आरटीओ कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याने भडगाव येथे शासनाने नुकतेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजुर केले. भडगाव एम एच 54 हा नोंदणी क्रमांक मिळाला आहे. या नुतन कार्यालय उद्यापासून प्रत्यक्षात भडगावला सुरू होणार आहे. या नुतन कार्यालय उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यालय उद्घाटन प्रसंगी भडगाव तालुका वासीयांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केले आहे.