१९ वर्षीय तरुणी सोबत शेतात अश्लील चाळे करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात१९ वर्षीय तरुणीस शेतात कामास घेऊन जाण्याचा बहाण्याने मक्याच्या पिकात नेत अश्लील चाळे करत जातीवाचक शब्द वापरून दम दिल्या प्रकरणी १९ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ७ मार्च २०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील पीडित फिर्यादी १९ वर्षीय तरुणी हिस संशयित आरोपी याने त्याच्या शेतात मटेरियल टाकण्यासाठी घेवून जात मक्याच्या पिकात फिर्यादीचा हात धरून तिला मिठीत घेवुन तिची छाती दाबून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.त्यावेळी फिर्यादीने आराडाओरड करुन आरोपीच्या हाताला झटका देवून स्वतःला सोडवत असताना फिर्यादीस जातीवाचक शब्द वापरून दम दिला म्हणून पीडित फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने संशयित आरोपी विरुद्ध पिंपळगाव हरे पो. स्टे. गु.र.क्र. ४६/२४भादवी कलम ३५४,३५४(अ),५०६ सह ॲट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला असून नमुद आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा.वरिष्ठांच्या आदेशाने उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरूळे सो.पाचोरा भाग, हे करीत आहेत.