अमळनेर पोलीस कोठडीत संशयित आरोपीची गळफास घेत आत्महत्या.
अमळनेर-
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत असलेल्या एका संशयीत आरोपीने लॉकअपमध्ये असलेल्या शौचालयात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज ९ मार्च शनिवार रोजी सकाळी घटना उघडकीस आली असून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट घेत पाहणी केली.
जळगाव जिल्ह्यातील मारवड पो.स्टे.ला दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी चोरीच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत (वय ४९ रा.डांगरी प्र.ता.अमळनेर) यास दि.२ मार्च रोजी ०९:४१ वा. अटक केली होती. गुन्ह्यात त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत दि.६ मार्च रोजी संपल्याने त्यास मारवड पोलीस स्टेशन येथील दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल गुन्ह्यात पोलीस कोठडी घेऊन वर्ग केले होते.
पोलीस कोठडीत असताना शनिवार दि.९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस लॉकअप अंमळनेर मधील शौचालयात संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना निदर्शनास येताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. अमळनेर येथे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.