Blog

शेवाळ येथे वंचित बहुजन आघाडी शाखा फलकाचे अनावरण.

शेवाळे येथे वंचित बहुजन आघाडी फलक अनावरण

पाचोरा (संपादक कुंदन बेलदार)

वंचित बहुजन आघाडी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव पश्चिम च्या वतीने दिनांक 13/ 09/2023 वार बुधवार रोजी सायंकाळी ठिक 5:00 वाजता मौजे शेवाळे. तालुका पाचोरा जिल्हा जळगाव पश्चिम येथे वंचित बहुजन आघाडी शाखाचे नाम फलकाचे अनावरण ढोल-ताश्यांचा गजरात जल्लोषात संपन्न झाला.
रविकांतजी वाघ जळगाव जिल्हा प्रभारी यांच्या मार्गदर्शन व मा. जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थितीत युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार होते सदर कार्यक्रम विशाल बागुल तालुकाध्यक्ष पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. पाचोरा तालुका महासचिव दीपक परदेशी व पाचोरा तालुका प्रसिध्दीप्रमुख आकाश पवार व कार्यकारणीतील पदाधिकारी तसेच भावी महिला आघाडी अध्यक्ष सिरीन पठाण यांनी मेहनत घेऊन 30-35 महिला व100-125 पुरुष मंडळी मिळुन कार्यक्रम घडवून आणला सदर कार्यक्रमाला अनमोल सहकार्य माजी सरपंच भिकन तडवी शेवाळे यांचे लाभले. यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष विशाल बागुल पाचोरा तालुका अध्यक्ष हे होते.अॅड. रविकांत वाघ साहेब यांनी नवनिर्वांची शाखाध्यक्ष गुलाब तडवी, उपाध्यक्ष एकनाथ निकम, मुकुंद तडवी सचिव ,किरण साठे खजिनदार तर रविंद्र वाघ सल्लागार यांच्या समवेत सर्व नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन केले . आणि आलेल्या मान्यवरांचे व महिलांचे सत्कार करण्यात आले यावेळेस सातगाव डोंगरी येथील शाखाध्यक्ष शेख मुस्ताक व एजाज भाई , सावखेडा गावाचे सरपंच व शाखा अध्यक्ष राजेश सोनवने व कार्यकर्ते तसेच वरखेडी & भोकरी येथून सुनिल भाऊ दांडगे व शेख चिराग भाई,लासुरे येथिल कार्यकर्ते, पाचोरा येथील दिपक सोनवणे, एजाज पिंजारी आणि सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आणि शेवाळे गावातील सरपंच , उपसरपंच तडवी मॅडम आणि सर्व सदस्य व गावातील शाहु, फुले, आंबेडकर विचारधारेचे नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!