दिंडोरी नाशिक-
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले स्मृतीदीनानिमित्त जागतिक महीला दिनाचे औचित्य साधून अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या वतिने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील तिस रणरागिणी महीलांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, मानाचा फेटा, शाल, गुलाबपुष्प देवुन “कर्तव्यनिष्ठ नारी गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव होते तर विचारपिठावर पोलीस निरीक्षक दुर्गेशजी तिवारी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक नरेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक युगंधरा केंद्रे, फाॅरेस्ट अधिकारी माधवी जाधव, डाॅ.नरेंद्र विसपुते, रिपाईचे महेंद्र साळवे, अमोल मते उपस्थित होते. प्रथम मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले प्रतमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी रविंद्रदादा जाधव म्हणाले की अन्याय अत्याचार निर्मुलन समितीमार्फत महिलांची सुरक्षितता, संरक्षण आणि लघुउद्योग छोटे व्यवसायधंद्यात प्रशिक्षण देवुन सक्षमीकरणाच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्याचा समितीचा मानस असुन त्यासाठी राज्यस्तरीय अधिवेशन घेतले जाईल असे प्रतिपादन केले. तर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडुन त्यांच्यावर सतत परिणाम करणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही समितीसोबत आहोत असे प्रतिपादन केले.
पोलीस उपनिरीक्षक युगंधरा केंद्रे यांनी महीलांना नागरी हक्कांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत समान भागीदार करून घेऊन महीला दक्षता समितुन होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे असे प्रतिपादन केले. पोलीस निरीक्षक नरेश जाधव यांनी महीलादिनानिमत्त शुभेच्छा दिल्या तर वनसंरक्षक अधिकारी माधवी जाधव यांनी भांडी घासणारी बाई ह्या कवितेच्या माध्यमातून स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कर्तृत्व व स्त्रियांचे समस्यांबाबत जनजागृती केली.
पुरस्कारार्थिच्या वतिने लक्ष्मीताई कुमावत व सुप्रिया विसपुते यांनी समितीचे आभार मानले. पाहुण्यांचा सत्कार स्वागताध्यक्ष व दिंडोरी तालुकाध्यक्ष रविभाऊ बागुल यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा मनिषाताई म्हसदे यांनी व सुत्रासंचालन प्रदीपनाना गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमास राधाताई क्षिरसागर, प्रदीप पगारे, सुरेश डांगळे, निर्मला गायकवाड, राजनंदीनी आहीरे, संगिता गायकवाड, वैशालीताई जाधव, ममता पुणेकर, अजय शेजुळ, वृषाली शेलार, माया मोहीते, शारदा वाघमारे, वर्षा बोरसे, आशाताई जाधव, मनिषा चतुर, ज्योती गरुड, रविराज सोनवणे, पंकज गागुर्डे, बाळासाहेब क्षिरसागर, वनिता जाधव, रोहीत गायकवाड, शाम गांगुर्डे, शारदा वाघमारे, अशोकभाऊ गागुर्डे, प्रमोद शिंदे,भुषण जाधव, रवि मोरे, सागर गायकवाड, संगिता गायकवाड, आदींसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीत व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.